उपयोगिता विश्लेषण स्वाध्याय इयत्ता बारावी भूगोल
प्रश्न. १. खालील विधाने पूर्ण करा :
१) घटत्या सीमान्त उपयोगितेच्या सिद्धांतात आल्फ्रेड मार्शल यांनी गृहीत धरलेली पैशाची उपयोगिता ………………..
अ) वाढते
ब) स्थिर राहते
क) घटते
ड) वाढते आणि नंतर घटते
उत्तर :
घटत्या सीमान्त उपयोगितेच्या सिद्धांतात आल्फ्रेड मार्शल यांनी गृहीत धरलेली पैशाची उपयोगिता स्थिर राहते
२) घटत्या सीमान्त उपयोगितेच्या सिद्धांतात सीमान्त उपयोगितेची संकल्पना …………………
अ) क्रमवाचक संकल्पना
ब) संख्यात्मक संकल्पना
क) क्रमवाचक संकल्पना आणि संख्यात्मक संकल्पना दोन्हीही
ड) यांपैकी नाही
उत्तर :
घटत्या सीमान्त उपयोगितेच्या सिद्धांतात सीमान्त उपयोगितेची संकल्पना संख्यात्मक संकल्पना
३) जेव्हा सीमान्त उपयोगिता ऋण होते, तेव्हा एकूण उपयोगिता ……………….
अ) वाढते
ब) स्थिर असते
क) घटते
ड) शून्य असते
उत्तर :
जेव्हा सीमान्त उपयोगिता ऋण होते, तेव्हा एकूण उपयोगिता घटते.
४) घटत्या सीमान्त उपयोगितेच्या सिद्धांतात सर्वाधिक समाधानाचा (तृप्ती) बिंदू म्हणजे जेव्हा ………………..
अ) एकूण उपयोगिता वाढते आणि सीमान्त उपयोगिता घटते.
ब) एकूण उपयोगिता घटते आणि सीमान्त उपयोगिता ऋण होते.
क) एकूण उपयोगिता महत्त्म होते आणि सीमान्त उपयोगिता शून्य होते.
ड) सीमान्त उपयोगिता घटते आणि एकूण उपयोगिता वाढते.
उत्तर :
घटत्या सीमान्त उपयोगितेच्या सिद्धांतात सर्वाधिक समाधानाचा (तृप्ती) बिंदू म्हणजे जेव्हा एकूण उपयोगिता महत्त्म होते आणि सीमान्त उपयोगिता शून्य होते.
५) घटत्या सीमान्त उपयोगितेच्या सिद्धांतात जेव्हा सीमान्त उपयोगिता घटते तेव्हा एकूण उपयोगिता ………………..
अ) वाढते
ब) घटते
क) बदलत नाही
ड) महत्त्म होते
उत्तर :
घटत्या सीमान्त उपयोगितेच्या सिद्धांतात जेव्हा सीमान्त उपयोगिता घटते तेव्हा एकूण उपयोगिता वाढते.
प्रश्न. २. योग्य जोडीचा पर्याय निवडा :
१)
| अ | ब |
|---|---|
| १) काळ उपयोगिता | अ) वाहतूक |
| २) स्थल उपयोगिता | ब) रक्तपेढी |
| ३) सेवा उपयोगिता | क) मोबाइल फोन |
| ४) ज्ञान उपयोगिता | ड) डॉक्टर |
पर्याय :
अ) १-ड, २-ब, ३-अ, ४-क
ब) १-ब, २-अ, ३-ड, ४-क
क) १-ंअ, २-ब, ३-क, ४-ड
ड) १-ब, २-क, ३-ड, ४-अ
उत्तर :
१-ब, २-अ, ३-ड, ४-क
२) उपभोक्त्याचा समतोल दर्शविणारे विधान …………………..
अ) सीमान्त उपयोगिता किंमतीपेक्षा जास्त
ब) सीमान्त उपयोगिता व किंमती समान
क) सीमान्त उपयोगिता किंमतीपेक्षा कमी
ड) किंमत एकापेक्षा कमी
पर्याय :
i) अ आणि ब
ii) अ, ब आणि क
iii) अ, ब, क आणि ड
iv) फक्त ब
उत्तर :
फक्त ब
प्रश्न. ३. खालील उदारहणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा :
१) सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले.
उत्तर :
संकल्पना : काल उपयोगिता
स्पष्टीकरण : i) वस्तूच्या उपभोगाचा काळ बदलल्याने निर्माण होणारी उपयोगिता म्हणजे काल उपयोगिता होय.
ii) वरील उदाहरणात सलमा हिवाळ्यात स्वेटर खरेदी करत असल्याने त्यातुन काल उपयोगिता ही संकल्पना लक्षात येते.
२) निलेशने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले.
उत्तर :
संकल्पना : रुप उपयोगिता
स्पष्टीकरण : i) वस्तूच्या रुपात/आकारात बदल केल्याने वस्तूत निर्माण होणारी उपयोगिता.
ii) वरील उदाहरणात निलेशने त्याच्या बहिणीसाठी सोन्यापासुन बनवलेले दागिने खरेदी केल्याने त्यातून रुप उपयोगिता ही संकल्पना स्पष्ट होते.
३) कविताने संत्र्यांचे एकामागे एक पाच नग सेवन केले.
उत्तर :
संकल्पना : घटती सीमांत उपयोगिता/उपभोग सातत्य
स्पष्टीकरण : i) उपभोक्ता एकामागुन एक सलग वस्तुच्या नगांचा उपभोग घेते तेव्हा त्याला मिळणारी उपयोगिता घटत जाणारी असते.
ii) वरील उदाहरणात कविताने संत्र्यांने एकामागून एक सलग पाच नग सेवन केले असल्याने त्यातुन सीमांत उपयोगिता मिळेत हे लक्षात येते.
४) भूषणने चार चपात्या खाल्ल्यानंतर पाचवी चपाती खाण्यास नकार दिला.
उत्तर :
संकल्पना : सर्वाधिक समाधान/तृप्तीचा बिंदू
स्पष्टीकरण : i) सर्वाधिक समाधानाचा/तृप्तीचा बिंदू गाठल्या नंतर सर्वसाधारण उपभोक्ता वस्तूचा उपभोग घेण्याचे थांबवतो.
ii) वरील उदाहरणात भुषणने चार चपात्या खाल्या नंतर तृप्ती झाल्यामुळे पाचवी चपाती खाण्यास नकार दिला यावरून सर्वाधिक समाधान मिळते हे लक्षात येते.
५) ललिताने वही-पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली.
उत्तर :
संकल्पना : उपयोगिता
स्पष्टीकरण : i) मानवी गरज पुर्णकरण्याची वस्तू व सेवेच्या अंगी असणारी शक्ती म्हणजे उपयोगिता होय.
ii) वरील उदाहरणात ललिताला निबंध लेखनाची गरज पुर्ण करण्याची क्षमता वही व पेनमध्ये आहे. त्यातुन उपयोगितेची संकल्पना स्पष्ट होते.
प्रश्न. ४. खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा :
| वस्तूचे नग | एकूण उपयोगिता | सीमान्त उपयोगिता |
|---|---|---|
| १ | ६ | ६ |
| २ | ११ | ५ |
| ३ | १५ | ४ |
| ४ | १५ | ० |
| ५ | १४ | – १ |
१) एकूण उपयोगिता व सीमान्त उपयोगिता वक्र काढा.
उत्तर :

२) अ) जेव्हा एकूण उपयोगिता महत्त्म असते तेव्हा सीमान्त उपयोगिता
उत्तर :
शून्य
ब) जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमान्त उपयोगिता
उत्तर :
ऋण होते
प्रश्न. ५. सविस्तर उत्तरे लिहा :
१) घटत्या सीमान्त उपयोगितेचा सिद्धान्त उपवादासह स्पष्ट करा.
उत्तर :
प्रस्तावना : डॉ. आल्फ्रेड मार्शल यांनी १८९० मध्ये आपल्या “अर्थशास्त्राची मुलतत्वे” Principle of Economics या ग्रंथात हा सिद्धांत विस्तृत स्वरूपात मांडला. सर्वप्रथमि हा सिद्धांत प्रा. गॉसेन यांनी मांडला होता. त्यामुळे त्याला गॉसेनचा पहिला नियम म्हटले जाते.
नियम : “इतर परिस्थिती स्थिर असताना, मनुष्याजवळ असलेल्या एखाद्या वस्तुच्या साठ्यात वाढ होत गेल्यास, त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान, त्या वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर क्रमश: घटत जाते.”
तक्त्याद्वारे स्पष्टीकरण : “घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत पुढील तक्त्याद्वारे स्पष्ट करता येईल.
| ‘x’ ची नगसंख्या | सीमान्त उपयोगिता |
|---|---|
| १ | १० |
| २ | ०८ |
| ३ | ०६ |
| ४ | ०४ |
| ५ | ०२ |
| ६ | ० |
| ७ | -२ |
वरील तक्त्याद्वारे असे स्पष्ट होते की, एखाद्या वस्तूच्या नगांचा उपयोभ जसजसा वाढत जातो. तसी त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता क्रमश: घटत जाते. व शेवटी ऋण होते.

वरील आकृतीत य अक्षावर सीमांत उपयोगिता व क्ष आक्षावर वस्तूचे नग दाखविले आहेत. नगांचा उपभोग वाढून सीमांत उपयोगिता घटल्याने सीमांत उपयोगिता वक्र वरून खाली उतरणारा वनतो.
अपवाद :
i) छंद : पोस्टाची तिकीटे, दुर्मिळ नाणी, दुर्मिळ चित्रे यांचा संग्रह करणे, वाचन करणे, संगित ऐकणे यांसारख्या छंदाच्या बाबतीत हा नियम लागू होत नाही म्हणुन हे या नियमाला अपवाद आहेत.
ii) कंजूष व्यक्ती : कंजूष उपभोक्ता हा लोभी असतो. त्याला प्रत्येक वाढीव नगापासुन अधिक समाधान मिळते. त्यामुळे हा नियम कंजुष व्यक्तींना लागू होत नाही.
iii) व्यसन : मध्यपी व्यक्तीच्या बाबतीत असे दिसुन येते की, मध्याच्या प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी नशेची पातळी वाढत जाते. त्यामुळे व्यसन देखिल या नियमाला अपवाद आहे.
iv) पैसा : पैशाची सीमांत उपयोगिता कधीही शून्य होत नाही. पैशाच्या वाढीव नगापासून सीमांत उपयोगिता वाढत आहे. त्यामुळे पैसा देखिल या नियमाला अपवाद आहे.
v) सत्ता : व्यक्तीला जसजशी सत्ता प्राप्त होते तसतशी सत्तेची लालसा वाढत जाते. त्यामुळे सीमांत उपयोगिता ही वाढते म्हणुन सत्ता ही नियमाला अपवाद ठरते.
वरील प्रमाणे काही अपवाद या नियमाला सांगितले जातात परंतु प्रत्येक अपवादामध्ये काही गृहितांचे उल्लघन होते. त्यामुळे ते अपवाद नसुन फक्त भासमान असतात.