१९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकीकरण स्वाध्याय इयत्ता बारावी राज्यशास्त्र
प्रश्न. १. अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
१) जागतिकीकरणाच्या युगात आर्थिक क्षेत्रात खालील महत्त्वाचे बदल झाले.
i) भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार
ii) गॅटची निर्मिती
iii) ट्रान्स-नॅशनल कंपनीचा उदय
iv) बौद्धिक संपदा हक्कावर लक्ष केंद्रित
अ) फक्त i, ii आणि iii बरोबर आहेत.
ब) फक्त i, ii आणि iv बरोबर आहेत.
क) फक्त i, iii आणि iv बरोबर आहेत.
ड) सर्व बरोबर आहेत.
उत्तर :
क) फक्त i, iii आणि iv बरोबर आहेत.
२) ‘साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था’ ही संकल्पना या देशासंदर्भात वापरली जाते.
अ) भारत
ब) चीन
क) फ्रान्स
ड) अमेरिका
उत्तर :
ब) चीन
ब) गटात न बसणारा शब्द ओळखा.
१) मोबाइल, सॅटेलाईट, इंटरनेट, ग्रामोफोन
उत्तर :
ग्रोमोफोन
क) संकल्पना सुचवा.
१) आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना –
उत्तर :
WTO (World Trade Organization) जागतिक व्यापारी संघटना
२) अनेक देशांत कार्यरत असलेली कंपनी –
उत्तर :
बहुराष्ट्रीय कंपनी (Malty National Company)
प्रश्न. २. खालील विधाने चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा.
१) जागतिकीकरणाने बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना जाणली.
उत्तर :
वरील विधान चूक आहे.
कारणे : i) बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप त्या राज्याच्या विचारप्रणालीवर अवलंबून असे.
ii) ज्यास अमेरिकेत बाजारपेठीय अर्थव्यवस्था म्हणतात, त्यास आर्थिक उदारीकरण ही संज्ञा भारतात वापरली जाते.
२) जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्त्व कमी झाले आहे.
उत्तर :
वरील विधान चूक आहे.
कारण : जागतिक स्तरावर बिगर सरकारी संस्थांचे महत्त्व वाढले आहे.
प्रश्न. ३. सहसंबंध स्पष्ट करा.
१) जागतिकीकरण आणि संस्कृती
उत्तर :
i) जागतिकीकरण हे संस्कृतीच्या प्रसाराचे एक प्रभावी माध्यम बनले आहे.
ii) समाजामध्ये व्यक्तिकेंद्री दृष्टिकोन आणि भौतिक सुखसोयींकडे कल वाढत चालला आहे.
iii) पारंपरिक मूल्यांच्या तुलनेत आधुनिकता व पाश्चात्य विचारसरणीला अधिक प्राधान्य दिले जाऊ लागले आहे.
iv) आहारपद्धतीमध्ये बर्गर, पिझ्झा यांसारख्या विदेशी खाद्यपदार्थांना विशेष स्थान मिळाले आहे.
२) गॅट आणि जागतिक व्यापार संघटना
उत्तर :
i) दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक व्यापारामध्ये समतोल निर्माण करण्याच्या उद्देशाने General Agreement on Trade and Tariff (GATT) हा करार करण्यात आला.
ii) मात्र या कराराच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र अशी कोणतीही कायमस्वरूपी संघटनात्मक यंत्रणा अस्तित्वात नव्हती.
iii) पुढे १९९५ मध्ये World Trade Organization (WTO) या संघटनेची निर्मिती करण्यात येऊन, आंतरराष्ट्रीय व्यापारावर देखरेख व नियंत्रण ठेवणारी ठोस यंत्रणा प्रत्यक्षात आणली गेली.
iv) थोडक्यात सांगायचे झाल्यास, WTO ची स्थापना ही GATT कराराच्या वाटचालीतील पुढचा टप्पा मानली जाते.
प्रश्न. ४. मत नोंदवा.
सहभागी राज्य समाजासाठी हितकारक आहे.
उत्तर :
सहभागी राज्य समाजासाठी हितकारक आहे, या विधानाशी ही सहमत आहे.
कारणे : i) ही संकल्पना लोकशाहीशी सुसंगत आहे.
ii) सहभागाद्वारा नागरिकांच्या राजकीय जाणिवा अधिक प्रगल्भ होतील.
iii) राज्यकार्यांवर प्रजेचा-नागरिकांचा अंकुश प्रस्थापित होईल.
प्रश्न. ५. पुढील प्रश्नाचे उत्तर लिहा.
जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू कोणत्या आहेत ?
उत्तर :
अ) सकारात्मक बाजू :
i) युवा वर्गासाठी स्वदेशात तसेच परदेशातही रोजगार व व्यवसायाच्या नवनवीन वाटा खुल्या होत आहेत.
ii) खासगी क्षेत्राच्या विस्तारामुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळत आहे.
iii) जागतिक पातळीवरील घडामोडींशी आपला संपर्क अधिक सक्षमपणे प्रस्थापित झाला असून, जगभरात घडणाऱ्या घटनांचे आणि त्यांच्या संभाव्य परिणामांचे भान आपल्याला अधिक स्पष्टपणे येऊ लागले आहे.
ब) नकारात्मक बाजू :
i) शासनाच्या जनकल्याणकारी उपक्रमांना खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ii) जागतिक स्पर्धेच्या रेट्यामुळे स्थानिक, विशेषतः लघु उद्योगक्षेत्र, धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जाते.
iii) बड्या कंपन्यांच्या तुलनेत अल्पभूधारक व लहान शेतकऱ्यांना शेतीक्षेत्रातील स्पर्धेत टिकाव धरणे कठीण होऊ शकते.