इयत्ता बारावी मराठी वेगवशता स्वाध्याय
१) अ) पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.
१) जीवन विभागणारे घटक –
उत्तर :
जीवन विभागणारे घटक – स्थिती, गती
२) विचारांची गती म्हणजे –
उत्तर :
विचारांची गती म्हणजे – प्रगती
३) अधोगती म्हणजे –
उत्तर :
अधोगती म्हणजे – दिशाहीन गती
४) अक्षम्य आवेग म्हणजे –
उत्तर :
अक्षम्य आवेग म्हणजे -विकृती
आ) कृती करा.

उत्तर :

इ) कारणे शोधा व लिहा.
१) अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते, कारण …………..
उत्तर :
अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते, कारण वेगवेगळ्या ठिकाणांमधील अंतर खूपच असते आणि दरडोई वाहन उपलब्ध असते.
२) लेखकाच्या मते गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा, कारण ……………..
उत्तर :
लेखकाच्या मते गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा, कारण रस्त्यावर अडचणी निर्माण होणार नाहीत.
२) अ) योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा.
१) जीवन अर्थपूर्ण होईल, जर …………….
अ) वाहन कामापुरतेच वापरले तर.
आ) वाहन आवश्यक कामासाठी वापरले तर.
इ) वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर.
ई) वरील तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर.
उत्तर :
जीवन अर्थपूर्ण होईल, जर वरील तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर.
२) निसर्गविरोधी वर्तन नसणे, म्हणजे …………….
अ) स्वत:ला वाहनाशी सतत जखडून ठेवणे
आ) वाहनाचा अतिवेग अंगीकारणे
इ) तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे.
ई) गरज नसताना वाहन वापरणे
उत्तर :
निसर्गविरोधी वर्तन नसणे, म्हणजे तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे.
आ) वाहन वापरातील फरक स्पष्ट करा.
| अमेरिका | भारत |
|---|---|
उत्तर :
| अमेरिका | भारत |
|---|---|
| i) घरोघर व दरडोई वाहन उपलब्ध असल्याने वाहतुकीसाठी याच साधनांचा वापर होतो. | i) येथे रुळांवरून चालणाऱ्या गाड्या असल्याने वाहतुकीसाठी याचाच वापर होतो. |
| ii) अमेरिका विकसित देश असल्यामुळे माणसे वेगाने जीवन जगतात. त्यामुळे प्रत्येक जण वाहन वापरतो. | ii) आपल्या देशात तितके वेगवान जीवन नाही. परंतु आपण वाहनांचा सरास वापर करीत असतो. |
| iii) रस्ते रुंद, सरळ, निर्विध्न आणि एकमार्गी असतात. त्यामुळे वाहनांचा वेग जास्त असतो. | iii) भारतात सहसा रस्त्यांची परिस्थिती अशी नाही. |
| iv) वेगामुळे माणसे वेभान होतात. त्यामुळे, अस्वस्थता विसरून बेहोशीने वेगाचा आश्रय घेतला जातो. | iv) रुळावरच्या गाड्यांमुळे माणसे भरकटत नाहीत. उलट त्यांचे धावणे थांबते. |
३) खालील वाक्यांचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा.
अ) यथाप्रमाण गती ही गरज आहे; पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे.
उत्तर :
वाहनाचा वापर योग्य प्रमाणात आणि गरजेनुसार करणे ही मानवाची स्वाभाविक आवश्यकता आहे. मात्र वाहनाचा अतिरेकी, गैरसोयीचा किंवा विनाकारण वापर करणे हे मानवी स्वभावाला धरून नाही, म्हणजेच ते अनैसर्गिक ठरते.
आ) आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात. मग वाहने माणसांवर स्वार होतात.
उत्तर :
सुरुवातीला माणूस आपल्या सोयीसाठी, वेळ वाचवण्यासाठी वाहन तयार करतो व वापरतो – म्हणजेच माणूस वाहनाचा स्वामी/नियंत्रक असतो. पण हळूहळू ते वाहन इतके अपरिहार्य होऊन जाते की माणसाचे संपूर्ण जीवनच त्या वाहनाभोवती फिरू लागते – म्हणजेच वाहन माणसावर स्वार होते, माणूस त्याचा गुलाम बनतो.
इ) उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये.
उत्तर :
वाहन हे सोयीसाठी असते. ते साधन आहे. आपला वेळ व आपले श्रम वाहनामुळे वाचतात. वाऱ्यासोबत त्याच्या वेगाने धावू लागलो तर काही क्षण आनंद मिळतो. आपल्या भावना उचंबळून येतात. या भावनांवर आपण आरूढ झालो, तर आपला वाहनावर ताबा राहत नाही आणि अपघातांची शक्यता निर्माण होते.
४) व्याकरण
अ) समानार्थी शब्द लिहा.
१) निकड –
उत्तर :
निकड – गरज
२) उचित –
उत्तर :
उचित – योग्य
३) उसंत –
उत्तर :
उसंत – सवड
४) व्यग्र –
उत्तर :
व्यग्र – गर्क
आ) खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.
१) ताणतणाव –
२) दरडोई –
३) यथाप्रमाण –
४) जीवनशैली –
उत्तर :
| सामासिक शब्द | विग्रह | समास |
|---|---|---|
| १) ताणतणाव | ताण, तणाव वगैरे | समाहार द्वंद्व |
| २) दरडोई | प्रत्येक डोईला | अव्ययीभाव |
| ३) यथाप्रमाण | प्रमाणाप्रमाणे | अव्ययीभाव |
| ४) जीवनशैली | जीवनाची शैली | विभक्ती तत्पुरुष |
इ) कंसातील सुचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
१) आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. (उद्गारार्थी करा.)
उत्तर :
किती विलक्षण वेगवानता आढळते आजच्या जीवनात !
२) आपल्याकडे कामाच्या ठिकाणाची अंतरे कमी आहेत. (नकारार्थी करा.)
उत्तर :
आपल्याकडे कामाच्या ठिकाणांची अंतरे जास्त नाहीत.
३) निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत ? (विधानार्थी करा.)
उत्तर :
माणसांची निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी जायला हरकत नाही.
५) स्वमत.
अ) ‘वाहनांच्या अतिवापराने शरीर व्यापारात अडथळे निर्माण होतात’, तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर :
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत वेळ आणि श्रम वाचावेत म्हणून आपण वाहनांवर अवलंबून राहू लागलो आहोत. मात्र हे अवलंबित्व आता इतके वाढले आहे की पायी चालणेच जवळपास बंद झाले आहे. खरे तर बसणे, उभे राहणे, जिना चढणे, चालणे, वळणे, तसेच वर-खाली पाहणे यांसारख्या शरीराच्या नैसर्गिक व मोकळ्या हालचालींमुळेच आपले शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहते. परंतु वाहनांच्या अतिरेकी वापरामुळे या नैसर्गिक हालचालींनाच खीळ बसते आणि परिणामी आरोग्याचे संतुलन ढासळून विविध व्याधी डोके वर काढतात.
वाहनांच्या बेसुमार वापरामुळे लठ्ठपणा, तसेच पाठीचा कणा, कंबर आणि मान यांच्याशी संबंधित विकार तर उद्भवतातच, शिवाय सतत घाईगडबडीच्या सवयीमुळे माणसाचे मानसिक संतुलनही ढळू लागते. एक उदाहरण घ्यायचे झाल्यास, पूर्वीच्या काळी अनेक मैलांचा प्रवास पायी करणारा मनुष्य शरीराने बळकट आणि निरोगी असे. याउलट, आजच्या काळात अगदी क्षुल्लक कामांसाठीही वाहन वापरणारा माणूस हृदयविकार, रक्तदाबवाढ यांसारख्या गंभीर आजारांना निमंत्रण देऊन स्वतःचे आयुष्य धोक्यात घालताना दिसतो. यामुळे त्याची रोजची दिनचर्या विसकटते आणि जगण्यातील खरा आनंद हरवून जातो. थोडक्यात, शरीराच्या नैसर्गिक कार्यप्रणालीत अनेक व्यत्यय निर्माण होतात.
आ) ‘वाढता वेग म्हणजे ताण’, याविषयी तुमचे मत सविस्तर लिहा.
उत्तर :
आजच्या स्पर्धात्मक आणि धकाधकीच्या युगात, हाती घेतलेली कामे ठराविक वेळेत पूर्ण करण्यासाठी आपल्याला वेगाचा स्वीकार करणे भाग पडते. ही कसरत जमली नाही, तर मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागते. वाहनांच्या बाबतीतही नेमकी हीच परिस्थिती आपल्याला अनुभवायला मिळते. वाहनाचा वेग जसजसा वाढत जातो, तसतसे त्यावरील आपले नियंत्रण कमी होत जाते आणि त्यामुळे नकळतच मनावर ताण येऊ लागतो. कारण गतीवरची पकड सुटली की अपघाताचा धोका निर्माण होतो. वेगाच्या या हव्यासापायी माणूस स्वतःच्या मनावरील ताबाच गमावून बसतो, ज्यातून मानसिक असंतुलन निर्माण होते. याशिवाय डोळे, मन आणि संपूर्ण शरीर यांच्यावरही याचा विपरीत परिणाम होतो.
अतिवेगामुळे संपूर्ण शरीरात नको तितकी आणि विचित्र स्पंदने निर्माण होऊन ताण वाढतच जातो. वेगामुळे शरीराला सतत बसणाऱ्या हादऱ्यांमुळे मज्जासंस्था आणि मणके दुर्बल होतात, परिणामी कंबर, पाठ व मान यांचे विकार जडतात. अशा प्रकारे शारीरिक तसेच मानसिक पातळीवर विविध प्रकारचे ताण निर्माण होतात. त्यामुळेच ‘वाढता वेग म्हणजेच वाढता ताण’ हे विधान मला सर्वस्वी योग्य वाटते.
इ) ‘वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते. ते वेळ घालवण्यासाठी नसते’, हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :
आपली कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी आपण वाहनांचा आधार घेतो, मात्र वेळ वाचवण्याच्या याच हेतूने वाहन वापरता वापरता काही जण त्याच वाहनांचे गुलाम बनून जातात. वाहनामुळे उपलब्ध झालेला अतिरिक्त वेळ घालवण्यासाठी, विनाकारण फिरण्यासाठी, किंवा ‘वाहन आहेच तर एक चक्कर मारून येऊ’ अशा मानसिकतेतून अनेकजण वाहनांचा वापर करताना दिसतात. आपल्या आयुष्यातील मौल्यवान वेळ अशा प्रकारे वाहनांवर स्वार होऊन फुकट घालवणारे अनेक लोक आपल्या आजूबाजूला आढळतात.
याचाच परिणाम म्हणून रस्त्यांवर वाहतूककोंडी, अपघात यांसारख्या समस्या निर्माण होतात आणि त्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते. खरे पाहता, वेळ वाचवायचा असेल तर वैयक्तिक वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणे अधिक उपयुक्त ठरू शकते. यामुळे वेळेची बचत तर होईलच, शिवाय इंधनाचीही बचत होईल. परिणामी प्रदूषण आणि वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल, आणि त्यातून वाया जाणारा वेळ व मानसिक तणाव यांपासूनही आपली सुटका होईल. म्हणूनच, वाहन हे वेळ वाया घालवण्यासाठी नसून वेळ वाचवण्यासाठी आहे, ही गोष्ट जर आपण सर्वांनी लक्षात घेतली, तर त्याचा फायदा संपूर्ण समाजाला होईल असे मला वाटते.
ई) ‘वाहनाची अतिगती ही विकृती आहे’, स्पष्ट करा.
उत्तर :
वाहन चालवताना जेवढी गरज आहे तेवढाच वेग राखणे स्वतःच्या हिताचे असते. मात्र स्वतःच्या भल्याचा विचार न करता माणसाने स्वीकारलेली अतिवेगाची सवय हे सर्वसामान्य मानसिकतेचे द्योतक निश्चितच नाही. निव्वळ वेगाने वाहन हाकणे, पुढच्या वाहनाला मागे टाकून आधी जाण्याच्या नादात वेग वाढवणे, किंवा मित्रमंडळींसोबत धाडसी करामती करण्याच्या उद्देशाने वाहनाचा वेग अनावश्यकरीत्या वाढवणे – ही सगळी एका प्रकारच्या मानसिक विकृतीचीच लक्षणे आहेत. विकृती म्हणजे मनाच्या पातळीवर घडलेला बिघाड, ज्यामध्ये बरे-वाईट किंवा त्याचे संभाव्य परिणाम यांची जाणीवच माणसाला उरत नाही.
इतरांशी एक प्रकारची मानसिक चढाओढ करत, आपणही अतिवेगात वाहन चालवू शकतो हे सिद्ध करण्याच्या नादात वाहने भरधाव वेगाने पळवणे – ही सगळी विकृतीचीच निदर्शक आहेत. अतिवेगाच्या मोहात पडल्याने वाहनावरील नियंत्रण सुटते आणि अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण होते, ज्यामध्ये स्वतःचा जीव गमावण्याचा धोका असतोच, शिवाय इतर निष्पाप लोकांचाही बळी जाऊ शकतो. हे सर्व माहीत असूनही, या संभाव्य परिणामांची तमा आपल्याला राहत नाही. यावरून हेच स्पष्ट होते की, अतिगतीच्या आहारी जाणे हे सर्वसामान्य मानसिक स्थितीचे लक्षण नसून, ती एक विकृतीच आहे असे माझे स्पष्ट मत आहे.
६) अतिव्यक्ती.
अ) रस्त्यावरील वाहतूक कोंडीत सापडल्यावर तुमची भूमिका काय असेल ते लिहा.
उत्तर :
भविष्यात जर मी रस्त्यावरील वाहतूककोंडीत अडकले, तर सर्वांत आधी ही कोंडी नेमकी कोणत्या कारणामुळे झाली आहे, हे समजून घेण्याचा मी प्रयत्न करेन. म्हणजेच सिग्नल यंत्रणा बिघडली आहे का, एखादा अपघात झाला आहे का, की काही वाहनचालक सिग्नल तोडून चुकीच्या मार्गाने घुसत आहेत – या पैकी नेमके कारण काय आहे, हे मी शोधून काढेन. जर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याचे लक्षात आले, तर मी लगेचच वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून त्यांना याबाबत कळवेन.
अपघात झाला असल्यास अपघातग्रस्त व्यक्तींना शक्य ती मदत करेन, तसेच पोलिसांना व रुग्णवाहिकेला त्वरित बोलावेन. काही लोक सिग्नल मोडून पुढे जात असतील, तर त्यांना समजावून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करेन. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, मी विनाकारण हॉर्न वाजवणार नाही, रांग मोडून मध्येच घुसणार नाही, आणि इतर कोणी असे करत असल्यास त्यांनाही तसे करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करेन. वाहनाचे इंजिन बंद ठेवून इंधनाची बचत करेन, आणि जर पर्यायी मार्ग उपलब्ध असेल, तर त्याचा वापर करेन.
आ) वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी, ते तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
वाहन चालवताना योग्य ती खबरदारी घेतली आणि वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले, तर प्रवास सुखकर, सुरक्षित आणि कमीत कमी वेळेत पार पडतो.
वाहन चालवण्यापूर्वी घ्यावयाची पूर्वतयारी :
i) गाडी चालवायला बसण्यापूर्वी दरवेळी वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) तसेच इतर आवश्यक कागदपत्रे (विमा, पीयुसी इत्यादी) सोबत असल्याची खातरजमा करून घ्यावी.
ii) टायरमधील हवेचे प्रमाण योग्य आहे का आणि गाडीत पुरेसे इंधन आहे का, याची खात्री करून घ्यावी.
प्रत्यक्ष वाहन चालवताना घ्यावयाची काळजी :
i) संपूर्ण लक्ष वाहन चालवण्यावरच केंद्रित ठेवावे.
ii) गाडीतील सहप्रवाशांच्या गप्पांमध्ये सहभागी होणे टाळावे.
iii) गाडीचा वेग पन्नास ते साठ किलोमीटरच्या मर्यादेबाहेर जाऊ देऊ नये, कारण आपल्याकडील बहुतांश रस्ते अद्यापही साठ किलोमीटरपेक्षा जास्त वेगासाठी सुयोग्य नाहीत.
iv) अतिवेगामुळे शरीराला सातत्याने हादरे बसतात, ज्याचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागतो आणि त्यातून विविध शारीरिक व्याधी उद्भवतात. त्यामुळे जास्त वेगाच्या मोहापासून दूर राहणेच योग्य ठरते.