आयुष्य आनंदाचा उत्सव स्वाध्याय

आयुष्य आनंदाचा उत्सव स्वाध्याय इयत्ता बारावी मराठी

१) अ) कृती करा.

१)

उत्तर :

२)

उत्तर :

३)

उत्तर :

आ) खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा.

१) यशम वैभव ही आनंद अनुभवण्याची निमित्तं आहेत.

उत्तर :

योग्य

२) पैशाने आनंद विकत घेता येऊ शकतो.

उत्तर :

अयोग्य

३) शिकण्यातला आनंद तात्पुरता असतो.

उत्तर :

अयोग्य

४) यशामुळे आत्मविश्वास वाढतो.

उत्तर :

योग्य

५) ज्यात तुम्हांला खरा आनंद वाटतो, तेच काम करा.

उतर :

योग्य

इ) हे केव्हा घडेल ते लिहा.

१) माणसाला आनंद दुसऱ्याला वाटावासा वाटतो, जेव्हा …….

उत्तर :

माणसाला आनंद दुसऱ्याला वाटावासा वाटतो, जेव्हा त्याच्या मनात आनंद मावेनासा होतो.

२) माणूस दु:खातून बाहेर पडत नाही, जेव्हा ………

उत्तर :

माणूस दु:खातून बाहेर पडत नाही, जेव्हा तो दु:खाला स्वत:च्या मनाबाहेर जाऊ देत नाही.

३) आनंद हा तुमचा स्वभाव होईल, जेव्हा ……..

उत्तर :

आनंद हा तुमचा स्वभाव होईल, जेव्हा आनंदातच राहायची सवय तुम्हांला पडते.

४) एका वेगळ्या विश्वात वावरता येतं, जेव्हा ……….

उत्तर :

एका वेगळ्या विश्वात वावरता येतं, जेव्हा आपण एखाद्या कलेशी दोस्ती करतो.

२) अ) खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

१) मानवी कवाडं –

उत्तर :

मानवाच्या मनात सुखदु:खाची सतत रेलचेल असते. एखादा वाईट प्रसंग इतके दु:ख देऊन जातो, की मन हे दु:ख कवटाळून बसतं. नवीन सुखाचा स्वीकार करण्यासाठी हे मन तयार नसतं. जणू मनाने दु:ख आत घेऊन सुखासाठी मनाचे दरवाजे म्हणजेच कवाडं कायमची बंद केलेली असतात. ही कवाडं मोकळी असतील तरच जीवनाचा आनंद घेता येतो. ज्याप्रमाणे घरात मोकळी हवा याची यासाठी घराची कवाडं मोकळी ठेवावी लागतात त्याप्रमाणेच मनात आनंदाचे वारे खेळते राहावे यासाठी मनाची कवाडे खुली ठेवावी लागतात.

२) आनंदाचा पाऊस –

उत्तर :

पाऊस म्हणजे भरभराट, समृद्धी. निसर्गाच्या हातात असलेल्या या पावसाची सारेच आतुरतेने वाट पाहत असतात. हा पाऊस जेव्हा अंगण भिजवतो, तेव्हा आपल्याला समृद्धीची चाहूल मिळते. आनंदाचा पाऊस अशीच भरभराट, मनाची समृद्धी आणणारा असतो. हा पाऊस मनाचे अंगण हळुवारपणे भिजवून मनाला प्रफुल्लित करतो. या पावसासाठी मात्र कोणावरही अवलंबून राहावं लागत नाही तो प्रत्येक जण आपणहून कधीही आणू शकतो.

आ) खालील चौकटी पूर्ण करा.

१) आनंदाला आकर्षित करणारा –

उत्तर :

आनंद

२) शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू –

उत्तर :

श्वास

३) बाहेर दाराशी घुटमळणारा –

उत्तर :

आनंद

४) आनंदाला प्रसवणारा –

उत्तर :

आनंद

५) आनंद अनुभवण्याची निमित्तं –

उत्तर :

यश, वैभव

३) व्याकरण.

अ) खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा.

१) एवढं मिळवूनही मी आनंदात का नाहीये ?

उत्तर :

प्रश्नार्थी वाक्य

२) ‘गोडधोड’ हे सुद्धा पूर्णब्रह्मच असतं की !

उत्तर :

उद्गारार्थी वाक्य

३) आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं.

उत्तर :

विधानार्थी वाक्य

आ) योग्य पर्याय निवडा व लिहा.

१) माणसं स्वत:चा छंद कसा विसरू शकतात ? या वाक्याचे विधानार्थी वाक्य –

अ) माणसं स्वत:चा छंद नेहमी विसरतात.

आ) माणसं स्वत:चा छंद लक्षात ठेवतात.

इ) माणसं स्वत:चा छंद विसरू शकत नाहीत.

ई) माणसं स्वत:चा छंद किती लक्षात ठेवतात.

उत्तर :

माणसं स्वत:चा छंद विसरू शकत नाहीत.

२) हा आनंद सर्वत्र असतो. या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य –

अ) हा आनंद कुठे नसतो ?

आ) हा आनंद कुठे असतो ?

इ) हा आनंद सर्वत्र नसतो का ?

ई) हा आनंद सर्वत्र असतो का ?

उत्तर :

हा आनंद कुठे नसतो ?

३) किती आतून हसतात ती ! या वाक्याचे विधानार्थी वाक्य –

अ) ती आतून हसतात.

आ) ती फार हसतात आतून.

इ) ती आतून हसत राहतात.

ई) ती खूप आतून हसतात.

उत्तर :

ती आतून हसतात.

इ) खालील तक्ता पूर्ण करा.

क्रसामासिक शब्दविग्रहसमासाचे नाव
१)झुणकाभाकर
२)सूर्याचा अस्त
३)अक्षर असा आनंद
४)प्रतिक्षण

उत्तर :

क्रसामासिक शब्दविग्रहसमासाचे नाव
१)झुणकाभाकरझुणका, भाकर वगैरेसमाहार द्वंद्व
२)सूर्यास्तसूर्याचा अस्तविभक्ती तत्पुरुष
३)अक्षरानंदअक्षर असा आनंदकर्मधारय
४)प्रतिक्षणप्रत्येक क्षणालाअव्ययीभाव

ई) खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.

१) स्वत:च्या आवडीचे काम निवडा.

उत्तर :

कर्तरी प्रयोग

२) लोकांना पेढे वाटणं वेगळं.

उत्तर :

भावे प्रयोग

३) कष्टाची भाकर गोड लागते.

उत्तर :

कर्तरी प्रयोग

उ) ‘आनंद’ या शब्दासाठी पाठात आलेली विशेषणे शोधा व लिहा.

उत्तर :

i) खरा, ii) आत्मिक, iii) अनोखा, iv) वेगळा, v) टिकाऊ

४) स्वमत

अ) ‘जे काम करायचचं आहे, त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतं’, या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.

उत्तर :

माणसाने आनंदी राहण्यासाठी आपल्याला जे क्षेत्र आवडते ते निवडावे, जे काम करायला आवडते ते करावे; पण परिस्थितीमुळे आपल्या आयुष्यात अनेक वेळा आपल्या इच्छेच्या विरुद्ध निर्णय घ्यावे लागतात. अशा वेळी जे काम करायच ते रडतखडत करण्यापेक्षा ते आनंदी होऊन कसे करता येईल, यासाठी प्रयत्न करावा. बऱ्याच वेळा एखादे काम आपल्याला जमत नसतं, म्हणूनही आपल्याला ते आवडत नसतं. मग प्रयत्नपूर्वक आपण ते काम शिकून घेतले, त्यातील कौशल्ये जाणून घेतली, तर नक्कीच त्यात आपल्याला आनंद मिळेल.

काम आपल्याला करायच हे एकदा मनाने स्वीकारलं म्हणजे यश मिळवणं सोपं जातं. शांत चित्तानं आणि आनंदी वृत्तीनं काम केल्यास हमखास यश मिळते व आत्मविश्वास वाढतो. ज्यामुळे पुन्हा यश मिळते. अर्थातच आपण आनंदी होतो. यशाची सवय लागते. आनंदाची सवय जडते. अखेर न आवडणारेच काम आवडू लागते. प्रत्येक काम प्रयत्नपूर्वक केले आणि या प्रयत्नांमध्ये आनंद शोधला, तर आनंदाची प्राप्ती होते. हे तंत्र एकदा समजले म्हणजे आपोआपच त्यामध्ये आपल्यालाही आनंद मिळवता येईल असे मला वाटते.

आ) ‘सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.

उत्तर :

‘दृष्टी तशी सृष्टी’ या उक्तीवरून आपण म्हणू शकतो, की आपली दृष्टी सुंदर असेल, ती सौंदर्य टिपणारी असेल तरच आपण सौंदर्याचा अनुभव घेऊ शकतो. ताजमहलाला भेट दिल्यावर तेथील प्रदूषण पाहण्यापेक्षा आपल्या दृष्टीने त्याचे सौंदर्य टिपले, तर एक निखळ आनंद आपल्याला मिळतो. या दृष्टीबरोबरच माणसाची वृत्तीदेखील सकारात्मक आणि आनंदच भोगणारी असणे अत्यंत आवश्यक आहे.

अन्यथा चांगल्या व्यक्तींमध्येही, चांगल्या गोष्टींमध्येही ती वाईटाचा शोध घेते. म्हणजेच, बिघाड त्या पाहणाऱ्या व्यक्तीच्या वृत्तीत असतो. लहान मुलांची वृत्ती आनंदी असल्याने ते जीवनातील प्रत्येक गोष्टीत आग्रहाने, अधिकाराने आनंद शोधतात. अशी वृत्ती प्रत्येकात रुजली, मोठेपणीही टिकली, तर माणूस आनंदा पासून कधीही वंचित राहणार नाही. आनंद व आनंदाचे क्षण सतत आपल्या भवतीभोवती फिरत असतात. हे क्षण टिपण्याची व अनुभवण्याची वृत्ती आपल्यात असणे आवश्यक असते. मग ही वृत्ती सूर्याच्या उगवण्याचाही आनंद आपल्याला मिळवून देईल.

इ) ‘आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत लागतं’, या विधानाचा तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.

उत्तर :

आनंद हा निखळ असेल, तरच तो खरा असतो, जो आपल्याला अनुभवताही येतो. आपण आपलं मन नेहमीच खुलं, स्वच्छ, शुद्ध ठेवलं पाहिजे. मनावरचे सर्व ताण, द्वेष यांपैकी काहीही मनामध्ये असेल, तर असे कटुतेने भरलेले मन जणू आनंदाला आत शिरण्यास मज्जावच करत असते ते दु:ख कुरवाळत बसते. अशा स्थितीत आनंदाची अनुभूती घेता येत नाही.

आपल्या आयुष्यात जर कधी एखादा दु:खद प्रसंग घडला, तर आपण आपलं मन दु:खाने एवढं भरून ठेवतो, की आनंदाला आत शिरण्यास जागाच शिल्लक नसते, तसे न करता आपण जाणीवपूर्वक दु:खाला बाहेर फेकण्याला व आनंदाला भरभरून आत घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आनंदाला आत येण्यास जागा मोकळी करून दिली पाहिजे, मनात जर दु:ख, चिता, टेन्शन यांपैकी काहीही असेल, तर ते पूर्णपणे बाहेर काढून फेकलं पाहिजे. आनंद हा आपल्यालाच घ्यावा लागतो. तो कोणी देईल याची वाट पाहायची नसते. त्यासाठी मात्र आपलं मन खुलं असावं लागतं. आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत कराव लागतं.

ई) ‘प्रत्येक माणसाला आपल्या अस्तित्वाचे भान असणे अत्यंत गरजेचे आहे’, तुमचे मत लिहा.

उत्तर :

आपलं अस्तित्व हीच खरंतर आपल्यासाठी सर्वांत अनमोल गोष्ट आहे. पृथ्वीसारख्या सुंदर स्थळी मानवजातील जन्मास येणे हीच मोठी आनंदाची बाब आहे. जीवनाचा प्रत्येक क्षण जगता येणं खोलवर श्वास घेता येणं यापेक्षा वेगळा आनंद काय ? निसर्गसौंदर्याने नटलेल्या या सृष्टीतील प्रत्येक सुंदर गोष्टीचा अनुभव घेता येणं यापेक्षा मोठा आनंद नाही. आपण आहोत म्हणून रम्य पहाट अनुभवतो; पक्ष्यांचा किलबिलाट ऐकणे, फुलांचे उमलणे, पावसाच्या हळुवार सरी झेलणे, बीज अंकुरताना पाहणे, लहानग्याचे निरागस हसू पाहणे अशा एक ना अनेक गोष्टी शक्य होतात.

त्यामुळे सतत बदलणारं तिथं प्रत्येक रूप तेवढचं आनंददायी असतं. हा आनंद अनुभवण्यासाठी आपण आपल्या दृष्टीचं, सृष्टीचं, श्वासाचं अस्तित्वाचं भान ठेवायलाच हवं. यातील आनंद मनमुराद लुटता यावा यासाठी आपलं असण म्हणजेच आपलं अस्तित्व हीच सर्वांत मोलाची गोष्ट आहे याचं भान आपण ठेवलंच पाहिजे; म्हणजे आपोआपच आपलं जीवन आनंदी होईल असं मला वाटतं.

५) अभिव्यक्ती

अ) खरा, टिकाऊ आनंद मिळवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर :

खऱ्या आनंदाची निर्मिती ही आपल्याच अंतरगात होत असते. आपले मन आपल्याला त्यासाठी सतत आनंदी ठेवता आले पाहिजे. त्यासाठी आपण वर्तमानात जगलं पाहिजे. आनंद मिळवण्यासाठी विशिष्ट गोष्टीत यश मिळवणे, पैसा मिळवणे या गोष्टींची आवश्यकता नसते. मात्र यश आणि हे वैभव मिळवण्यासाठी जे प्रयत्न आपण करतो, त्यामागे जी मेहनत, जे स्वकर्तृत्व असते, ते आणि त्याला मिळालेले फळ हे खरा आनंद देणारे असते. यामागे कोणत्याही गोष्टीचा लोभ, हव्यास नसतो. फक्त ती गोष्ट पूर्ण करण्यातला, ती अनुभवण्यातला आनंद खरा आनंद असतो.

फक्त स्पर्धेत पळून अफाट यश मिळवून प्राप्त होणारा आनंद हा क्षणिक असतो; पण त्यामागे जेव्हा स्वकर्तृत्व असते, त्यामागे जेव्हा मेहनत असते, ती गोष्ट करण्यात जेव्हा आनंद असतो तेव्हा त्यातून मिळणारा आनंद चिरकाळ टिकतो. याशिवाय एखादी कला अंगिकारणे, शिकणे, शिकवणे, एखादा छंद जोपासणे, वाचन करणे इत्यादी अनेक गोष्टींमधून आनंद मिळवता येतो. आनंद हा अंतरंगातच दडलेला असतो. अशा माध्यमातून तो लुटता येतो यासाठी आनंद टिपण्याची दृष्टी आणि आनंद अनुभवण्याची वृत्ती असावी लागते.

आ) तुमचे जीवन आनंदी होण्यासाठी तुम्ही काय कराल, ते लिहा.

उत्तर :

आपले जीवन आनंदी करणे हे फक्त आपल्याच हातात असते हे सत्य सर्वप्रथम मी स्वीकारेन. त्यामुळे, बाहेर आनंद शोधणे आपोआपच बंद होईल. आनंद आपल्या अंतरंगात असतो हा आनंद शोधून सापडणारच नाही त्यामुळे, हा आनंद बाहेर कुठेही न शोधता माझ्या अंतरंगातच मी त्याचा शोध घेईन. त्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे मी माझ्यातल लहान मूल कायमस्वरूपी जिवंत ठेवेन. लहान मुलांप्रमाणे छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद भरभरून घ्यायला शिकेन.

जे काम करायचं ते नुसतं उरकून टाकावं म्हणून न करता तेही आनंदाने कसं करता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन. एखादा तरी छंद जोपासेन. त्यासाठी दररोज वेळ देईन. निसर्ग, संगीत, पुस्तकं यांच्यासोबत मैत्री करेन, आयुष्य हसतखेळत व मजेत जगण्यासाठी मी नेहमीच आग्रही राहीन. माझ्या सर्वांत जवळच्या व प्रिय व्यक्तींसोबत वेळ घालवेन. मनाला विरंगुळा देणाऱ्या गोष्टी जाणीवपूर्वक करेन. अशाप्रकारे, मी माझे जीवन आनंदी करेन.

Leave a Comment