भारत निर्वसाहतीकरण ते एकीकरण स्वाध्याय इयत्ता बारावी इतिहास
प्रश्न. १. अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य विधाने निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा.
१. गोवा येथे इ. स. १९४३ मध्ये ……………….. यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन झाले.
अ) डॉ. राम मनोहर लोहिया
ब) डॉ. टी. बी. कुन्हा
क) डॉ. पी. पी. शिरोडकर
ड) डॉ. राम हेगडे
उत्तर :
गोवा येथे इ. स. १९४३ मध्ये डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन झाले.
२. हैदराबाद संस्थानाच्या मुक्तिलढ्याचे नेतृत्व ………………… यांनी समर्थपणे केले.
अ) राजा हरिसिंग
ब) स्वामी रामानंद तीर्थ
क) पंडित महादेवशास्त्री जोशी
ड) केशवराव जेधे
उत्तर :
हैदराबाद संस्थानाच्या मुक्तिलढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी समर्थपणे केले.
३. भारतामध्ये …………….. यांच्या प्रयत्नातून अनेक संस्थाने विलीन झाली.
अ) जयंतराव टिळक
ब) सरदार वल्लभभाई पटेल
क) पंडित जवहारलाल नेहरू
ड) डॉ. टी. बी. कुन्हा
उत्तर :
भारतामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नातून अनेक संस्थाने विलीन झाली.
ब) पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
|---|---|
| १. हैदराबाद संस्थानचे विलिनीकरण | – स्वामी रामानंद तीर्थ |
| २. काश्मीर संस्थानचे विलिनीकरण | – शेख अब्दुल्ला |
| ३. गोवा मुक्तिलढ्यातील मोलाचे योगदान | – मोहन रानडे |
| ४. पुदुच्चेरी येथील कामगार नेते | – व्ही. सुबय्या |
उत्तर :
चुकीची जोडी : काश्मीर संस्थानचे विलिनीकरण – शेख अब्दुल्ला
दुरुस्त जोडी : काश्मीर संस्थानचे विलिनीकरण – राजा हरिसिंग
प्रश्न. २. ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यांसंबंधीची नावे लिहा.
१. भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात विलीन न झालेले सौराष्ट्रातील संस्थान –
उत्तर :
जुनागढ
२. गोवा कॉँग्रेस कमिटीचे प्रमुख –
उत्तर :
डॉ. टी. बी. कुन्हा
प्रश्न. ३. पृष्ठ क्र. ५६ वरील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

१. भारताच्या वायव्य दिशेकडील दिशेकडील राष्ट्र कोणते ?
उत्तर :
पाकिस्तान
२. भारतातील पोर्तुगिजांचे सत्ताकेंद्र कोणते ?
उत्तर :
गोवा
३. पूर्व किनारपट्टीवरील फ्रेंचांची सत्ताकेंद्रे कोणती ?
उत्तर :
चंद्रनगर, पुदुच्चेरी, कारिकल, यानम
४. भारताच्या दक्षिणेस कोणते राष्ट्र कोणते ?
उत्तर :
श्रीलंका
प्रश्न. ४. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

उत्तर :

प्रश्न. ५. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
१. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.
उत्तर :
i) निजामाच्या पाठिंब्याने स्थापन झालेल्या रझाकार संघटनेने हिंदू आणि मुस्लिम यांच्यावर अत्याचार केले.
ii) लोकशाही चळवळीला पाठिबा देणाऱ्या प्रजेवर रझाकार संघटनेने अत्याचार केला.
iii) भारत सरकारने निजामाशी समोपचाराची बोलणी करण्याचा प्रयत्न केला आणि तो अयशस्वी ठरला संस्थान पाकिस्तान विलीन करण्याकडे त्यांचा कल होता.
शेवटी निजामाविरुद्ध पोलिस कारवाई करून निजामाला शरण यायला भाग पाडले आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.
२. पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश बनला.
उत्तर :
i) पुदुच्चेरीमधील जनतेची आंदोलने आणि भारत सरकारची आग्रही मागणी यांच्यामुळे जून १९४८ मध्ये फ्रान्स व भारत सरकारमध्ये करार होऊन पुदुच्चेरीचा भारतात विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात आला.
ii) १३ ऑक्टोंबर १९५४ रोजी उभय सरकारमध्ये विलिनीकरणाची प्रक्रिया निश्चित झाली. विधिमंडळ व नगरपालिकांमध्ये विलिनीकरणाच्या बाजूने मतदान झाले.
iii) १ नोव्हेंबर १९५६ रोजी पुदुच्चेरीसह सर्व फ्रेंच वसाहतीचा भारताने ताबा घेतला.
iv) १९६२ रोजी विलिनीकरणाच्या कराराला फ्रेंच संसदेने मान्यता दिली आणि १९६३ मध्ये पुदुच्चेरी हा भारताचा केंद्रशासित प्रदेश बनला.
प्रश्न. ६. तुमचे मत नोंदवा.
१. हैदराबाद संस्थानात आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र परिषदांची स्थापना झाली.
उत्तर :
i) हैदराबाद हे भारतातील सर्वात मोठे संस्थान होते.
ii) हैदराबाद संस्थानात तेलगू, कन्नड, मराठी भाषिक प्रांताचा समावेश होता.
iii) निजामाच्या एकतंत्री राजवटीत नागरी व राजकीय अधिकारांचा अभाव होता.
iv) आपले अधिकार आपल्याला मिळावेत अशी या सर्व भाषिकांची मागणी होती.
v) यासाठी त्यांना संघटित होण्याची गरज भासू लागली.
vi) या जाणिवेतूनच संस्थापनातील तेलगू भाषिकांनी तेलंगण भागात आंध्रपरिषद, मराठी भाषिकांसाठी मराठवाडा भागात महाराष्ट्र परिषद आणि कर्नाटक भागात कर्नाटक परिषद या संस्थांची स्थापना केली.
२. इ. स. १९६१ पर्यंत गोव्यातील पोर्तुगीज राजवट अबाधित राहिली.
उत्तर :
i) भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर पोर्तुगीजांनी भारतातील वसाहतींना स्वातंत्र्य देणे अपेक्षित होते परंतु त्यांनी गोवा सोडण्यास नकार दिला.
ii) गोवा मुक्तीसाठी तेथील जनतेने काही संघटना स्थापन केल्या डॉ. टी. बी. कुन्हा यांच्या सारख्या अनेक नेत्यांनी सत्याग्रह व आंदोलने केली.
iii) पोर्तुगीज सरकारने या नेत्यांना तुरुंगात टाकले आणि जनतेवर अत्याचार करण्यात सुरुवात केली.
iv) गोव्यातील जनतेच्या लोक भावनेची दखल घेत केंद्र सरकारला म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंचा त्यांची दखल घ्यावी लागली.
v) त्यांनी ‘ऑपरेशन विजय’ ही लष्करी कारवाई करून गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला.
vi) संस्थानाच्या विलिनीकरणाच्या मानाने पोर्तुगीज आणि फ्रेंच वसाहतींचे भारतात फार उशिरा विलिनीकरण झाले.