युरोपीय वसाहतवाद स्वाध्याय

युरोपीय वसाहतवाद स्वाध्याय इयत्ता बारावी इतिहास

प्रश्न. १. अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा.

१. ‘स्वातंत्र्याचा जाहिरनामा’ ………………….. याने तयार केला.

अ) जॉर्ज वॉशिंग्टन

ब) थाॅमस जेफरसन

क) लॉर्ड ॲमहर्स्ट

ड) लॉर्ड कॉर्नवॉलिस

उत्तर :

‘स्वातंत्र्याचा जाहिरनामा’ थाॅमस जेफरसन याने तयार केला.

२. दुसरे ब्रह्मी युद्ध …………………… च्या काळात लढले गेले.

अ) लॉर्ड ॲम्हर्स्ट

ब) लॉर्ड डफरीन

क) लॉर्ड हलहौसी

ड) ॲशले एडन

उत्तर :

दुसरे ब्रह्मी युद्ध लॉर्ड डलहौसी च्या काळात लढले गेले.

ब) पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.

‘अ’ गट‘ब’ गट
१. टोगोलँड– जर्मन वसाहत
२. इजिप्त– ब्रिटिश वसाहत
३. ऑरेंज फ्री स्टेट– डच वसाहत
४. आयव्हरी कोस्ट– पोर्तुगीज वसाहत

उत्तर :

चुकीची जोडी : आयव्हरी कोस्ट – पोर्तुगीज वसाहत

दुरुस्त जोडी : आयव्हरी कोस्ट – फ्रान्स वसाहत

प्रश्न. २. अ) ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यांसंबंधीची नावे लिहा.

१. अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील फ्लोरिडा ते कॅलिफोर्नियाचा प्रदेश या सत्तेच्या ताब्यात होता –

उत्तर :

अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील फ्लोरिडा ते कॅलिफोर्नियाचा प्रदेश या सत्तेच्या ताब्यात होता – स्पॅनिश सत्ता

२. या राणीच्या काळात इंग्लंडच्या सागरी मोहिमांना प्रोत्साहन मिळाले –

उत्तर :

या राणीच्या काळात इंग्लंडच्या सागरी मोहिमांना प्रोत्साहन मिळाले – राणी एलिझाबेथ पहिली

ब) दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा.

१. म्यानमारवर कब्जा मिळवणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते. कारण –

अ) ब्रिटिशांना साम्राज्यविस्तार करायचा होता.

ब) म्यानमारमधील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि हक्काची बाजारपेठ यावर ताबा मिळवणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते.

क) ब्रिटिशांना युरोपीय वसाहतवादी स्पर्धेत पुढे राहायचे होते.

ड) म्यानमारचा राजा थिबा याला त्यांना धडा शिकवायचा होता.

उत्तर :

ब) म्यानमारमधील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि हक्काची बाजारपेठ यावर ताबा मिळवणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते.

प्रश्न. ३. संकल्पनाचित्र पूर्ण करा.

उत्तर :

प्रश्न. ४. टीपा लिहा.

१. वसाहतवादाचे स्वरूप

उत्तर :

युरोपीय व्यापारी ज्या ज्या प्रदेशात पोहोचले, तिथे त्यांनी आपापल्या वसाहती उभारल्या. या वसाहतींवर आर्थिक, सामाजिक आणि राजकीय नियंत्रण मिळवण्यासाठी युरोपीय राष्ट्रांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या भागांत युरोपीयनांना पोषक हवामान लाभले, त्यामुळे तिथे स्थिरावणे त्यांना तुलनेने सोपे गेले. मात्र आशिया खंडातील हवामानाशी जुळवून घेणे त्यांच्यासाठी कठीण ठरले. तरीही हवामान अनुकूल असो वा प्रतिकूल, युरोपीयनांनी स्थानिक लोकांना त्यांच्या भूमीतून हुसकावून लावण्यास मागेपुढे पाहिले नाही. आपल्या बलाढ्य आरमारी ताकदीच्या जोरावर इंग्लंडने आशिया आणि आफ्रिका खंडांतील अनेक राष्ट्रांवर वर्चस्व प्रस्थापित केले. व्यापारातून मिळणारा जास्तीचा नफा पुन्हा गुंतवला जाई, त्या गुंतवणुकीसाठी नव्या वसाहतींची गरज भासे, आणि वसाहतींमधून पुन्हा व्यापार व नफा मिळवला जाई – असे हे चक्र सुरू राहिले. इंग्लंडप्रमाणेच फ्रान्स, बेल्जियम आणि जर्मनी हे देशही वसाहती स्थापन करण्यात अग्रेसर होते.

२. अमेरिकन स्वातंत्र्युद्ध

उत्तर :

वसाहतवादी युरोपीय स्थलांतरितांनी अमेरिका खंडातील मूळ रहिवाशांच्या जमिनी हिसकावून घेतल्या आणि गरज पडेल तेव्हा त्यांची निर्घृण कत्तलही केली. अमेरिकेच्या भूमीवर ऊस आणि तंबाखूची लागवड करण्यासाठी मनुष्यबळ हवे होते, म्हणून स्पॅनिश लोकांनी आफ्रिकेतून गुलामांना जबरदस्तीने आणले. पुढे जेव्हा सोने-चांदीचे साठे सापडले, तेव्हा शेतीकडे दुर्लक्ष करून सोने मिळवण्यावरच त्यांनी सर्व भर दिला. १७७४ साली फिलाडेल्फिया येथे वसाहतींचे प्रतिनिधी एकत्र आले आणि त्यांनी ब्रिटनसोबतच्या आयात-निर्यात व्यवहारांना विरोध दर्शवला. ब्रिटिश मालावर बहिष्कार टाकण्याचा ठराव त्यांनी संमत केला. यातूनच अमेरिकेतील वसाहतींनी ब्रिटिश वसाहतवादाविरोधात सशस्त्र लढा सुरू केला. या संघर्षात फ्रान्सनेही अमेरिकेला साथ दिली, तर १७७९ मध्ये स्पेनही अमेरिकेच्या बाजूने युद्धात सामील झाला. वसाहतींचे सरसेनापती जॉर्ज वॉशिंग्टन यांनी इंग्रजांचा दारुण पराभव केला. अखेर इंग्रज सेनापती लॉर्ड कॉर्नवॉलिस याने शरणागती पत्करली आणि अमेरिका स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आली.

प्रश्न. ५. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

१. औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली.

उत्तर :

आधुनिक यंत्रसामग्रीच्या वापरामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली, मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादन देशांतर्गत बाजारपेठेत खपवणे शक्य नव्हते. त्यामुळे अतिरिक्त मालाची विक्री करण्यासाठी नव्या बाजारपेठा शोधणे अपरिहार्य बनले. या काळात युरोपातील भांडवलदार वर्ग अधिकाधिक संपन्न होत गेला आणि त्यांच्याकडे साचलेले जास्तीचे भांडवल गुंतवण्यासाठी सुरक्षित ठिकाणांचा शोध सुरू झाला. यासाठी आर्थिकदृष्ट्या विकसित वसाहतींमधील बाजारपेठा त्यांना अधिक विश्वासार्ह आणि सुरक्षित वाटल्या.

२. युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या.

उत्तर :

युरोपीय राष्ट्रांमध्ये वसाहती स्थापण्याची चढाओढ सुरू झाली, तेव्हा या शर्यतीत पोर्तुगाल आणि स्पेन हे देश आघाडीवर होते. पोर्तुगालने अमेरिका खंडातील ब्राझीलवर तर स्पेनने मेक्सिकोवर आपला ताबा प्रस्थापित केला. या भागांत त्यांना सोन्याचे मोठे साठे सापडले, शिवाय ऊस आणि तंबाखूच्या लागवडीसाठीही तिथले हवामान अनुकूल ठरले. सोबतच सोने-चांदीचे मुबलक साठेही उपलब्ध होते. शेतीबरोबरच खाणकामातूनही अमेरिकेतून प्रचंड प्रमाणात खनिज संपत्ती मिळवली गेली. या वसाहतींमधून कच्चा माल स्पेनला पाठवला जाई आणि तिथे त्यावर प्रक्रिया करून तयार झालेला पक्का माल पुन्हा वसाहतींच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवला जाई. सोने-चांदीच्या या व्यापारातून स्पेनच्या राजाला अफाट नफा मिळत असे. स्पेनची ही भरभराट पाहून इंग्लंड, हॉलंड आणि फ्रान्स या देशांनीही अमेरिका खंडात आपापल्या वसाहती उभारण्यास सुरुवात केली.

Leave a Comment