रे थांब जरा आषाढघना स्वाध्याय

रे थांब जरा आषाढघना स्वाध्याय इयत्ता बारावी मराठी

१) अ) कारणे शोधा.

१) कवी आषाढघनाला थांबायला सांगतात, कारण ……………………

उत्तर :

कवी आषाढघनाला थांबायला सांगतात, कारण आषाढघनाच्या कृपेने निर्माण झालेले निसर्गसौंदर्य त्याच्यासोबत कवींना डोळे भरुन पाहायचे आहे.

२) कवीने आषाढघनाला घडीभर सांगितले, कारण ……………………

उत्तर :

कवीने आषाढघनाला घडीभर सांगितले, कारण आकाशातून नवीन कोवळी हळदीच्या रंगांची उन्हे धरतीवर यावीत.

आ) खालील वर्णनासाठी कवितेत आलेले शब्द लिहा.

१) शेतातील हिरवीगार पिके –

उत्तर :

शेतातील हिरवीगार पिके – कोमल पाचूंची शेते

२) पोवळ्यांसारखी लाल कणीदार माती –

उत्तर :

पोवळ्यांसारखी लाल कणीदार माती – प्रवाळ माती

३) वेळूंच्या बेटांचे वर्णन करणारा शब्द –

उत्तर :

वेळूंच्या बेटांचे वर्णन करणारा शब्द – इंद्रनीळ

४) फुलपाखरांच्या पंखांवरील रत्नासारखे तेज दर्शवणारा शब्द –

उत्तर :

फुलपाखरांच्या पंखांवरील रत्नासारखे तेज दर्शवणारा शब्द – रत्नकळा

इ) एका शब्दात उत्तर लिहा.

१) रोमांचित होणारी –

उत्तर :

गंध – केतकी

२) नव्याने फुलणारी –

उत्तर :

सोनचंपकी

३) लाजणाऱ्या –

उत्तर :

जाईच्या लेकी

ई) कृती करा.

१)

उत्तर :

२)

उत्तर :

२) जोड्या लावा.

‘अ’ गट‘ब’ गट
१) काळोखाची पीत आंसवेअ) पाऊस उघडला तर पाण्यातील चंद्रबिंब पाहात
२) पालवींत उमलतां काजवेआ) ओलसर वातावरणातील मिट्ट काळोखाचे दु:ख अनुभवत
३) करूं दे मज हितगूज त्यांसवेंइ) वृक्षापालवीत उघडमीट करत चमकणाऱ्या काजव्यासोबत
४) निरखीत जळांतिल विधुवदनाई) मला गुजगोष्टी करू दे

उत्तर :

‘अ’ गट‘ब’ गट
१) काळोखाची पीत आंसवेआ) ओलसर वातावरणातील मिट्ट काळोखाचे दु:ख अनुभवत
२) पालवींत उमलतां काजवेइ) वृक्षापालवीत उघडमीट करत चमकणाऱ्या काजव्यासोबत
३) करूं दे मज हितगूज त्यांसवेंई) मला गुजगोष्टी करू दे
४) निरखीत जळांतिल विधुवदनाअ) पाऊस उघडला तर पाण्यातील चंद्रबिंब पाहात

३) खालील ओळींचा अर्थ लिहा.

कणस भरूं दे जिवस दुधानें

देठ फुलांचा अरळ मधानें

कंठ खगांचा मधु गानानें

आणीत शहारा तृणपर्णां

उत्तर :

पाऊस थांबल्यावर जराशी उघडीप होऊन कोवळे ऊन जेव्हा घरतीवर येईल तेव्हा पौष्टिक दुधाने भरलेले कणीस दिसते. फुलांचा देठ अलवार मधाने भरलेला असतो. पक्ष्यांच्या गळ्यातली गोड किलबिल स्वर ऐकून गवताच्या पात्यांच्या अंगावर शहारा फुललेला दिसतो.

४) काव्यसौंदर्य

आश्लेषांच्या तुषारस्नानीं

भउन पिसोळीं थव्याथव्यांनीं

रत्नकळा उधळित माध्यान्हीं

न्हाणोत इंद्रवर्णांत वना, या ओळींतील काव्यसौंदर्य स्पष्ट करा.

उत्तर :

कवी बा. भ. बोरकर यांनी ‘रे थांब जरा आषढघना’ या कवितेमध्ये आषाढ महिन्यात धरतीवर पडणाऱ्या पावसामुळे निसर्गसृष्टीत झालेले सौंदर्यमय बदल नादमय व ओघवत्या शब्दकळेत चित्रित केले आहेत. वरील ओळींमध्ये भिरभिरणाऱ्या फुलपाखरांच्या थव्याचे वर्णन केले आहे.

आषाढातील पाऊस थोडासा थांबल्यावर खाली येणाऱ्या कोवळ्या उन्हाने सृष्टी लख्ख झाली. आश्लेषा या पावसाळी नक्षत्रातील पाऊस पडताना त्यांच्या टपटपणाऱ्या थेंबांची आंघोळ फुलपाखरांना होत आहे. त्या थेंबाना भिऊन फुलपाखरे थव्याथव्यांनी भिरभिरत फुलांवरून रुंजी घालत आहेत. माध्यान्ही म्हणजेच भर दुपारी आपल्या रंगीबेरंगी पंखाची रत्ने प्रभाव उधळीत त्याच्या निळ्या रंगात साऱ्या रानाला जणू भिजवीत उडत आहेत. फुलपाखरांचे अतिशय प्रत्ययकारी चित्र डोळ्यांसमोर उभे राहील, असे ओघवते वर्णन उपरोक्त वर्णन ओळींत कवींनी शब्दलाघवाने केले आहे. पिसोळी या ग्रामीण शब्दांचे फुलपाखरांचा इवला भिरभिरणारा देह डोळे दिपवणारा ठरला आहे.

5) रसग्रहण

खालील ओळींचे रसग्रहण करा.

रे थांब जरा आषाढघना

बघुं दे दिठि भरुन तुझी करुणा

कोमल पाचूंचीं हीं शेतें

प्रवाळमातीमधलीं औंतें

इंद्रनीळ वेळूंची बेटें

या तुझ्याच पदविन्यासखुणा

रोमांचित ही गंध-केतकी

फुटे फुलीं ही सोनचंपकी

लाजुन या जाईच्या लेकी

तुज चोरुन बघती पुन्हापुन्हा

उत्तर :

आशयसौंदर्य : कवी बा. भ. बोरकर यांच्या ‘रे थांब जरा आषाढघना’ या निसर्ग कवितेतील या उपरोक्त ओळी आहेत. आषाढ महिन्यात धुवाधार पाऊस पडतो आणि सृष्टीसौंदर्य फुलून येते. या नयनरम्य दृश्याने वर्णन करताना कवी आषाढमेघाला थोडेसे थांबून हा सौंदर्यसोहळा पाहण्याची विनवणी करीत आहेत.

काव्यसौंदर्य : आकाशात आषाढमेघ दाटून आले आहेत. त्या आषाढमेघाला उद्देशून कवी म्हणतात हे आषाढमेघा, जरासा थांब आणि तुझ्या कृपेने नटलेले निसर्गसौंदर्य मला तुझ्यासोबत डोळे भरुन पाहू दे. कोमल नाजूक पाचूंच्या रंगाची ही हिरवीगार शेते. पोवळ्याच्या लाल रंगाच्या मातीत चालणारे नांगर, ही इंद्रनील रत्नांच्या प्रभेसारखी बांबूची बेटे या सर्व तुझ्याच पाऊलखुणा आहेत. तुझ्या आगमनाने रोमांचित झालेली सुवासिक केतकी, नुकतीच उमळलेली सोनचाफ्याची कळी आणि जाईच्या लाजऱ्या मुली, तुला पुन्हा पुन्हा चोरुन बघत आहेत, अशी ही तू निर्माण केलेली किमया पाहा.

भाषावैशिष्ट्ये : उपरोक्त पंक्तीमध्ये कवींनी संस्कृतप्रचुर नादमय शब्दरचना केली आहे. आषाढाच्या आगमनाने भवतालची नटलेली सृष्टी नादमय शब्दकळेत रंगवलेली आहे. विशेष म्हणजे आषाढघन, केतकी, सोनचाफ्याची कळी, जाईची फुले, यावर मानवी भावनांचे आरोपण करून कवींनी अंत:करणाला भिडणारे सौंदर्य प्रत्ययकारी रितीने मांडले आहे. निसर्ग आणि मानव यातील सजीव अतूट नाते लालित्यपूर्ण शब्दात चित्रित केले आहे. लाजणाऱ्या जाई आणि रोमांचित होणारी केतकी यातला ह्रदय भावनावेग रसिकांच्या मनाला भिडतो.

6) अभिव्यक्ती

अ) आषाढातील पावसाचा तुम्ही घेतलेला एखादा अनुभव शब्दबद्ध करा.

उत्तर :

आषाढातले ते दिवस होते. महाविद्यालयातला अखेरचा तास आटोपून आम्ही मैत्रिणी घराच्या दिशेने निघालो होतो. इतक्यात आकाशात एकाएकी काळ्याकुट्ट ढगांची दाटी झाली. सूर्य पाहता पाहता त्या ढगांआड लपला. कडकडाट करत वीज चमकली आणि पावसाच्या मुसळधार धारांनी अवघी धरती चिंब भिजून गेली.

आमच्याजवळ छत्र्या असूनही पावसात भिजण्याची मौज लुटायची होती, म्हणून छत्री न उघडताच आम्ही अंगावर सरी झेलत मनमुराद भिजलो. पावसाने साचलेल्या इवल्याशा डबक्यांमध्ये उड्या मारत आम्ही आनंद साजरा केला. जणू मोकाट सुटलेल्या वासरासारखे हिरव्यागार गवतावर बागडलो.

त्यानंतर पावसात न्हाऊन निघालेली झाडे, ओलसर मातीतला चिखल आणि बेडकांचा डराव डराव आवाज न्याहाळण्यात आम्ही रमून गेलो. महाविद्यालयाच्या आवारातली फुलझाडे पावसाच्या मोठमोठ्या थेंबांनी डवरून गेली होती, तर समोरचा रस्ता पाण्याने तुडुंब भरला होता. पाण्याचे लोंढेच्या लोंढे उसळी घेत, वाट मिळेल तिकडे वेगाने धावत सुटले होते. तो नजारा अनुभवतानाचा आनंद खरोखर अविस्मरणीय होता, जो आजही मनावर कायमचा कोरला गेला आहे.

आ) ‘आषाढघनाचे आगमन झाले नाही तर….’ या विषयावर निबंध लिहा.

उत्तर :

आषाढातील घनदाट मेघांचे आगमन होताच संपूर्ण सृष्टी पुलकित होते. चोहीकडे हिरवाईचा साज चढतो. निसर्गातील प्रत्येक घटकात नवचैतन्य संचारते. पण समजा, कधी हे आगमनच घडले नाही तर ?

तर मात्र सर्वत्र हाहाकार उडेल. संपूर्ण सृष्टी ओसाड बनेल. सभोवतालचे वातावरण उदास आणि भकास वाटू लागेल. कारण पर्जन्य घेऊन येणारे काळे ढग जोपर्यंत नभांगणी दाटत नाहीत, तोपर्यंत पावसाचा एक थेंबही धरतीवर पडणार नाही. आणि पाऊसच नसेल, तर शेतीचे उत्पादन कसे होणार? बळीराजा पुरता कोलमडून जाईल. शेतीशिवाय त्याच्या घराचा गाडा तरी कसा चालेल ?

त्याच्या डोक्यावर असलेले पीककर्ज फेडणे तरी कसे शक्य होईल ? हिरवाई कुठेच नजरेस पडणार नाही. झाडे-वेली पाण्याअभावी करपून जातील. त्यांवरची फुले सुकतील, फळांमधला रसरशीतपणा नाहीसा होईल. विहिरी-तळी कोरडी पडतील. जनावरांचे चारा-पाण्याविना अतोनात हाल होतील. माणसांनाही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागेल. पाण्यावर अवलंबून असलेले सगळे उद्योग-कारखाने बंद पडतील. पाण्याअभावी सामान्य माणसाचे दैनंदिन व्यवहारही ठप्प होतील. एकंदरीत, संपूर्ण जीवसृष्टीचे अपरिमित नुकसान होईल. असे व्हायलाच नको !

‘आषाढातील मेघ जर आलेच नाहीत तर…’ – ही कल्पनाच न केलेली बरी !

Leave a Comment