वीरांना सलामी स्वाध्याय इयत्ता बारावी मराठी
१) अ) कृती करा.
१)

उत्तर :

२)

उत्तर :

३)

उत्तर :

४)

उत्तर :

आ) चौकटीत उत्तरे लिहा.
१) तोलोलिंगच्या पायथ्याशी असलेले स्मारक
उत्तर :
तोलोलिंगच्या पायथ्याशी असलेले स्मारक – ऑपरेशन विजय
२) भयाण पर्वतांवर चढणारे
उत्तर :
भयाण पर्वतांवर चढणारे – धैर्यधर सैनिक
३) मृत्यूलाच आव्हान देणारी
उत्तर :
मृत्यूलाच आव्हान देणारी – २२ – २३ वर्षांचे तेजस्वी तरुण
४) कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देणारी
उत्तर :
कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देणारी – ड्रायव्हर स्टानझिन
५) चीवास जणांची लडाख भेट
उत्तर :
चीवास जणांची लडाख भेट – मिशन लडाख
इ. कारणे लिहा.
१) थरथरत्या हातांनी आणि डबडबलेल्या डोळ्यांनी ‘ऑपरेशन विजय’ च्या स्मारकाला सलाम केला, कारण ……………
उत्तर :
थरथरत्या हातांनी आणि डबडबलेल्या डोळ्यांनी ‘ऑपरेशन विजय’ च्या स्मारकाला सलाम केला, कारण ते स्मारक होते हुतात्मा झालेल्या २२ – २३ वर्षांच्या कोवळ्या तरुणांचे
२) ‘मिशन लडाख’ आणि राखी पौर्णिमे’ चा मुहूर्त निवडला, कारण …………….
उत्तर :
‘मिशन लडाख’ आणि राखी पौर्णिमे’ चा मुहूर्त निवडला, कारण आपल्या रक्षणकर्त्या प्रत्यक्ष भेटून राखी बांधली, आशीर्वाद दिले, तर आपली कृतज्ञता व्यक्त होईल, असे लेखिकांना वाटत होते.
३) लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या, अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ऋणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं, कारण …………
उत्तर :
लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या, अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ऋणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं, कारण लष्कर म्हटले की रुक्ष, भावनाहीन माणसे या कल्पनेच्या अगदी विरुद्ध असे त्यांचे वर्तन होते. अत्यंत प्रेमाने ते सर्वांचे आतिथ्य करीत होते.
४) समाजात होत जाणाऱ्या बदलांबद्दल कर्नल राणा थोडे व्यथित होते, कारण …………
उत्तर :
समाजात होत जाणाऱ्या बदलांबद्दल कर्नल राणा थोडे व्यथित होते, कारण समाजात वाढलेल्या उथळपणामुळे नवीन तरुणांमधून खरा सैनिक घडवणे जिकिरीचे बनले होते.
ई) पाठाच्या आधारे खालील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा.
१) एवढासा भावनिक ओलावाही त्यांना उबदार वाटत होता.
उत्तर :
सैनिक करत असलेल्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लेखिका व तिच्या सहकाऱ्यांनी रक्षाबंधनाचा अनोखा सोहळा पार पाडला. मायेने भरलेल्या या वातावरणात सर्वांचेच मन भरून आले होते. मायेच्या उबदार स्पर्शाने सर्व सैनिकांना मनोमनी सुखावल्यासारखे वाटत होते. एरव्ही त्यांचे आयुष्य प्रेमाच्या बाबतीत रुक्ष असते. त्यामुळे, तशा परिस्थितीत लाभलेला थोडासा भावनिक ओलावाही त्यांना उबदार वाटत होता.
२) ‘सेवा परमो धर्म:’
उत्तर :
‘सेवा परमो धर्म:’ याचा अर्थ ‘सेवा हाच खरा धर्म’ असा होतो. प्रत्येक सैनिक देशसेवेसाठी सदैव तत्पर असतो. आपले काम चोख बजावणारे हे लष्कर जेव्हा लेखिका व तिच्या सहकाऱ्यांना संकटाच्या स्थितीतून जबाबदारीने बाहेर काढते तेव्हा लेखिकाला ‘सेवा परमो धर्म:’ या उक्तीची प्रकर्षाने जाणीव होते. देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या या सैन्याविषयी अभिमान वाटतोच; पण त्यांच्या आचरणात मुरलेल्या ‘सेवा परमो धर्म:’ या ब्रीद वाक्याची प्रचीतीही लेखिकाला येते.
३) गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरेजडित झाल्या.
उत्तर :
नैसर्गिक आपत्तीमुळे रस्ते बंद झालेल्या स्थितीत अडकलेली लेखिका व तिचे सहकारी यांचा भीतीने थरकाप उडाला होता. अपेक्षित स्थळी पोहोचता न आल्याने मिट्ट अंधाराच्या भयाण स्थितीत अडकलेली, चौतीस जणांची जबाबदारी असणारी लेखिका पुरती घाबरलेली होती. यामुळे, डोळ्यांत अश्रू दाटलेल्या लेखिकेच्या मदतीला जेव्हा भारतीय सैन्य पुन्हा एकदा उभे राहते, आपल्या सहकाऱ्यांच्या सुरक्षिततेची जेव्हा लेखिकेला हमी मिळते तेव्हा डोळ्यांतून भीतीने वाहणारे अश्रू क्षणात आनंदाश्रूंमध्ये परिवर्तित होतात.
४) लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात.
उत्तर :
प्रस्तुत वाक्य ब्रिगेडियर कुशल ठाकूर यांनी लेखिकेच्या कार्याचे कौतुक करताना उच्चारले. लेखिका दरवर्षी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लष्करीतील सैनिकांसाठी रक्षाबंधनाचा सोहळा आयोजित करत असत. रक्षाबंधनाच्या या सोहळ्यामुळे सामान्य नागरिक व सैनिक यांच्यातील अनोखे भावनिक बंध अधिकाधिक दृढ होत होते. म्हणूनच, लेखिका करत असलेले हे कार्य देशातील नागरिकांपासून दूर असणाऱ्या या सैनिकांमध्ये आणि त्यांच्या कार्यापासून अनभिज्ञ असणाऱ्या नागरिकांमध्ये भावनिक सेतू निर्माण करणारे आहे असे ब्रिगेडियर म्हणतात.
२) व्याकरण.
अ) खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
१) जमीन अस्मानाचा फरक असणे.
उत्तर :
अर्थ : खूप मोठा फरक असणे.
वाक्य : श्रीमंत आणि गरीब यांच्या राहणीमानात जमीन अस्मानाचा फरक असतो.
२) आग ओकणे
उत्तर :
अर्थ : अतिशय रागाने व संतापाने बोलणे.
वाक्य : शिक्षकांनी अभ्यास न केलेल्या विद्यार्थ्यांवर आग ओकली.
३) अंगावर काटा येणे.
उत्तर :
अर्थ : भीतीने किंवा आश्चर्याने शरीर शहारणे.
वाक्य : भयकथा ऐकताना माझ्या अंगावर काटा आला.
४) मनातील मळभ दूर होणे.
उत्तर :
अर्थ : मनातील दुःख, चिंता किंवा गैरसमज नाहीसे होऊन मन प्रसन्न होणे.
वाक्य : मित्राशी मनमोकळेपणाने बोलल्यावर माझ्या मनातील मळभ दूर झाले.
आ) खालील तक्ता पूर्ण करा.
| क्र. | वाक्य | वाक्यप्रचार | बदलासाठी सूचना |
|---|---|---|---|
| १) | जमेल का हे सारं आपल्याला ? | ………….. | विधानार्थी करा. |
| २) | तुम्ही लष्कराचं मनोबळ खूप वाढवत आहात. | ………….. | उद्गारार्थी करा. |
| ३) | यापेक्षा मोठा सन्मान कोणताही नव्हता. | ………….. | प्रश्नार्थक करा. |
| ४) | पुढील सगळे मार्ग बंदच होते. | ………….. | नकारार्थी करा. |
उत्तर :
| क्र. | वाक्य | वाक्यप्रचार | बदलासाठी सूचना | |
|---|---|---|---|---|
| १) | जमेल का हे सारं आपल्याला ? | प्रश्नार्थी वाक्य | विधानार्थी करा. | हे सारं आपल्याला करता येईल. |
| २) | तुम्ही लष्कराचं मनोबळ खूप वाढवत आहात. | विधानार्थी | उद्गारार्थी करा. | तुम्ही लष्कराचं मनोबळ किती वाढवत आहात ! |
| ३) | यापेक्षा मोठा सन्मान कोणताही नव्हता. | नकारार्थी वाक्य | प्रश्नार्थक करा. | यापेक्षा मोठा सन्मान तो कोणता ? |
| ४) | पुढील सगळे मार्ग बंदच होते. | होकारार्थी वाक्य | नकारार्थी करा. | पुढील एकही मार्ग चालू नव्हता. |
इ) खालील तक्ता पूर्ण करा.
| क्र. | सामाजिक शब्द | विग्रह | समासाचे नाव |
|---|---|---|---|
| १) | बावीसतेवीस | ||
| २) | ठायीठायी | ||
| ३) | शब्दकोश | ||
| ४) | यथोचित |
उत्तर :
| क्र. | सामाजिक शब्द | विग्रह | समासाचे नाव |
|---|---|---|---|
| १) | बावीसतेवीस | बावीस किंवा तेवीस | वैकल्पिक द्वंद्व समास |
| २) | ठायीठायी | प्रत्येक ठिकाणी | अव्ययीभाव समास |
| ३) | शब्दकोश | शब्दांचा कोश | षष्ठी तत्पुरुष समास |
| ४) | यथोचित | जसे उचित असे तसे | अव्ययीभाव समास |
ई) योग्य पर्याय निवडा व लिहा.
१) तुम्ही गाडीतच बसा. या वाक्यातील प्रयोग –
अ) भावे प्रयोग
आ) कर्तरी प्रयोग
इ) कर्मणी प्रयोग
उत्तर :
कर्तरी प्रयोग
२) त्यांना आपण जपलं पाहिजे. या वाक्यातील प्रयोग –
अ) कर्तरी प्रयोग
आ) भावे प्रयोग
इ) कर्मणी प्रयोग
उत्तर :
भावे प्रयोग
३) पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य –
अ) त्यांनी आम्हांला दृक्-श्राव्य दालनात नेले.
आ) भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच.
ई) आम्ही धैर्याचा मुखवटाच चढवला होता.
उत्तर :
आम्ही धैर्याचा मुखवटाच चढवला होता.
३) स्वमत.
अ) ‘जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है, उस देश से थोडासा प्यार तो करो।’ असे शहीद झालेल्या वीराच्या आईने का म्हटले आहे, ते स्पष्ट करा.
उत्तर :
प्रस्तुत विधान हे देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या एका शहिदाच्या मातेच्या मुखातून आलेले आहे. या वीरमातेच्या शब्दांतून तिची देशाविषयीची आंतरिक तळमळ स्पष्टपणे जाणवते. याचा अर्थ असा नव्हे की, प्रत्येकाने सैनिक बनून सीमेवर उभे राहावे अशी अपेक्षा या विधानातून व्यक्त होते आहे. मात्र एक जागरूक नागरिक म्हणून प्रत्येकाची स्वतःची अशी काही कर्तव्ये असतात, याचे भान आपण ठेवायला हवे. प्रत्येक व्यक्तीच्या मनात देशाविषयी प्रेम आणि आपुलकी असणे आवश्यक आहे. हे प्रेम सिद्ध करण्यासाठी सीमेवर जाऊन लढणेच गरजेचे असते असे नाही; आपली नेमून दिलेली कामे, आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे आणि शिस्तबद्ध रीतीने पार पाडणे हीदेखील एक प्रकारची देशसेवाच होय.
नागरिक थोडे सजग आणि सतर्क राहिले, तर अनेक छोटे-मोठे अपघात तसेच दहशतवादी कृत्ये टाळता येऊ शकतात. परिसर स्वच्छ ठेवणे, गरजू व्यक्तींना साहाय्य करणे, निसर्गाचे रक्षण व संवर्धन करणे, लहान मुले आणि वृद्धांची काळजी घेणे, तसेच स्त्रिया व ज्येष्ठांचा सन्मान राखणे – या सर्व गोष्टीही देशभक्तीचाच एक भाग मानल्या जातात. देशावरील आपले प्रेम व्यक्त करण्याची संधी सामान्य माणसाला देखील उपलब्ध असते, हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे.
आपली जबाबदारी ओळखून, माणसाने माणुसकीच्या नात्याने दुसऱ्या माणसाकडे पाहिले, तर आपोआपच देशसेवा घडून येते. पण प्रत्यक्षात असे वर्तन फारसे आढळून येत नाही, याची सल या वीरमातेच्या बोलण्यातून जाणवते.
आ) ब्रिगेडियर ठाकूर यांनी शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना मार्गदर्शन करण्याची विनंती लेखिकेला का केली असावी, ते स्पष्ट करा.
उत्तर :
रक्षाबंधनाच्या निमित्ताने लेखिका दरवर्षी सामान्य जनतेला भारतीय सैन्याशी भावनिकदृष्ट्या जोडण्याचा एक प्रयत्न करत असत. लष्कर आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्ये स्नेहबंध निर्माण करण्याचे हे कार्य लेखिका करत आहेत, याची स्पष्ट जाणीव ब्रिगेडियर ठाकूर यांना होती. हीच बाब लक्षात घेऊन, शहरातील तल्लख बुद्धिमत्तेच्या तरुणांना सैन्यदलाकडे आकर्षित करण्यासाठी लेखिकेने पुढाकार घ्यावा, अशी विनंती ब्रिगेडियर ठाकूर यांनी केली.
आजच्या काळात तरुण पिढीचा कल जास्त पगार देणाऱ्या नोकऱ्यांकडेच अधिक असल्याचे स्पष्टपणे दिसते. याचाच परिणाम म्हणून, बुद्धिमत्तेने वरचढ असणारी मुले ठराविक करिअर क्षेत्रांनाच प्राधान्य देताना आढळतात. सैन्यदलात दाखल होण्याचा विचार अशा हुशार मुलांच्या मनात फारसा येत नाही. वास्तविक पाहता, अत्यंत नाजूक आणि संवेदनशील असलेल्या या क्षेत्राला खऱ्या अर्थाने कुशाग्र बुद्धिमत्तेची गरज आहे, ही बाब मात्र सर्वांच्याच विस्मरणात गेल्यासारखी वाटते.
आपण या देशाचे रहिवासी असल्यामुळे स्वतःच्या हक्कांविषयी नेहमी जागरूक असतो, पण देशाप्रती असणाऱ्या कर्तव्यांकडे मात्र कानाडोळा करतो. देशाची भावी वाटचाल आणि देशाची सुरक्षा या दोन्ही गोष्टी अत्यंत मोलाच्या असून, त्या सक्षम आणि खंबीर हातांमध्ये असणे किती आवश्यक आहे, याची जाणीव तरुणांना करून दिली, तर निश्चितच अशी मुले सैन्यदलाकडे वळतील. त्यांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन लाभले, तर त्यांच्या मनात सुप्त असलेली राष्ट्रभक्तीची भावना नक्कीच जागी होऊ शकते.
मात्र हे सारे कोणीतरी आपुलकीने, मनापासून समजावून सांगायला हवे आणि हे कार्य लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांच्याकडूनच उत्तम रीतीने होऊ शकेल, असा दृढ विश्वास ब्रिगेडियर ठाकूर यांना वाटत होता.
इ) ‘आम्हांला सैनिक नावाचा माणूस कळू लागला’, या विधानाचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
उत्तर :
दरवर्षी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर, कारगिल युद्धाचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या लडाख या भूमीत सैनिकांची भेट घेताना लेखिकेचे या जवानांशी एक विलक्षण नाते तयार झाले. प्रत्येक वर्षी येणाऱ्या नव्या अनुभवांतून लेखिकेसमोर सैनिकाचे व्यक्तिमत्त्व अधिकाधिक स्पष्टपणे उलगडत गेले. या संपूर्ण प्रवासात, कर्नल झा यांच्यासारखा ‘वन्स कनेक्टेड, ऑलवेज कनेक्टेड’ या तत्त्वाला जागणारा सैनिक लेखिका व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभा राहिला. सैनिकांना केवळ आपल्या शब्दांतून आणि उपस्थितीतून बळ, उभारी देण्याची गरज असते, ही जाणीव त्यांनी लेखिकेला करून दिली.
एका तरुण सैनिकाने लेखिकेच्या गळ्यात पडून अश्रू ढाळले, या घटनेतून लेखिकेला जाणवले की सैनिक हा प्रेमाचा, मायेचा, आपुलकीचा भुकेला असतो. सैनिकांना खरोखर हवी असते ती केवळ मायेची सावली, हे लेखिकेच्या ध्यानात आले. कोणत्याही संकटप्रसंगी देशरक्षणासाठी सज्ज असणारे हे जवान, त्यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येकाचे तितक्याच प्रेमाने स्वागत व सन्मान करतात, हे लेखिकेने प्रत्यक्ष अनुभवातून जाणले.
कर्नल राणा यांच्यासारखी शिस्तशील आणि समाजवास्तवाचे भान असणारी व्यक्ती जेव्हा वर्तमान परिस्थितीबद्दल अंतर्मनातून व्यथित होते आणि सैनिकांना समजून घेण्यासाठी लेखिकेचे तिथे उपस्थित राहणे किती मोलाचे आहे हे स्पष्ट करते, तेव्हा सैनिकाला जाणून घेऊन त्याला सर्वसामान्य नागरिकांशी जोडण्याचे लेखिकेने हाती घेतलेले कार्य फलद्रूप होताना दिसते. देशसंरक्षणाची जबाबदारी समर्थपणे पेलणारा, तरीही मनाने हळवा असलेला, आपुलकी व प्रेमाची ओढ जपणारा सैनिक आणि त्याच्या आत दडलेला संवेदनशील माणूस — हे दोन्ही पैलू आपल्याला उलगडू लागले आहेत, याची खात्री लेखिकेला पटली.
४) अभिव्यक्ती.
अ) सैनिकी जीवन आणि सामान्य नागरिकांचे जीवन यांची तुलना तुमच्या शब्दांत करा.
उत्तर :
सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात ‘स्व’ला मोठे महत्त्व असते. स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतच त्याचे संपूर्ण जीवन व्यतीत होत असते. मात्र सैनिकाचे जीवन स्वार्थाच्या मर्यादा केव्हाच ओलांडून पुढे गेलेले असते. त्यांचे संपूर्ण आयुष्य केवळ देश आणि देशबांधवांच्या भल्यासाठी समर्पित असते. आठ-नऊ तासांच्या कामानेच दमछाक होणाऱ्या सर्वसामान्य माणसाची तुलना, अनेक दिवस प्रतिकूल परिस्थितीतही सतत, न थकता कार्यरत राहणाऱ्या सैनिकाशी कशी होऊ शकेल? आज हे सैनिक सीमेवर उभे आहेत म्हणूनच आपण प्रत्येक क्षण, प्रत्येक सणवार आपल्या कुटुंबीयांसमवेत आनंदाने साजरा करू शकतो; पण हेच सैनिक मात्र आपल्या कुटुंबापासून दुरावून एकाकी आयुष्य कंठत असतात.
सामान्य माणसाचे संपूर्ण जीवन ‘आराम’ मिळवण्याच्या धडपडीत निघून जाते. मात्र सैनिकाच्या जीवनाचा आरामाशी कणभरही संबंध नसतो. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन या दोनच दिवशी सर्वसामान्यांना देशाची आठवण होते; पण हे सैनिक मात्र देशाला सतत हृदयात जपून, त्याच्या सुरक्षेसाठी अखंड झटत असतात. पैसा कमावणे आणि सुखसमाधान मिळवणे हे सर्वसामान्य माणसाचे स्वप्न असते. सामान्य नागरिक सुरक्षित आयुष्य जगत असतो, पण त्याचे हे आयुष्य सुरक्षित राखणारा, त्याचे रक्षण करणारा सैनिक मात्र स्वतःचे प्राण सतत हातावर घेऊन वावरत असतो. सामान्य माणूस केवळ स्वतःच्या कुटुंबासाठी झटत असतो, तर सैनिक हा लाखो कुटुंबांचा आधारस्तंभ, त्यांचा पोशिंदा असतो. सैनिकांचे जीवन आणि सर्वसामान्य नागरिकांचे जीवन यांची तुलनाच होऊ शकत नाही, हेच खरे वास्तव आहे.
आ) कारगिलमधील पुलावर पहारा करणाऱ्या सैनिकाच्या, ‘सिर्फ दिमाग में डाल देना है।’ या उद्गारातील आशय तुमच्या जीवनात तुम्ही कसा अंमलात आणाल ते लिहा.
उत्तर :
सलग ३६ तास पहारा देत उभा राहणारा सैनिक या कष्टप्रद कामाने अजिबात थकल्यासारखा दिसत नाही. उलट, तितकाच वेळ हे काम अखंडपणे पुढे चालू ठेवण्याची तयारीही तो दाखवतो आणि त्यासाठी ‘सिर्फ दिमाग में डाल देना है।’ एवढेच सहज उद्गार काढतो. या एका वाक्यातून त्या सैनिकाने आपल्या मेंदूच्या शक्तीवर, इच्छाशक्तीच्या बळावर स्वतःच्या शारीरिक क्षमतेवर पूर्ण नियंत्रण मिळवल्याचे स्पष्ट दिसते. आपल्या मेंदूमध्ये दडलेली अफाट ताकद नेमकी कशी वापरायची, याचे नेमके भान त्याला आलेले जाणवते. हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून, मीदेखील माझ्या बुद्धीच्या आणि इच्छाशक्तीच्या जोरावर स्वतःमधील उणिवा भरून काढण्याचा प्रयत्न करेन.
स्वतःची क्षमता ओळखून ती अधिकाधिक विकसित करण्याचा प्रयत्न करेन. आयुष्यात एक निश्चित ध्येय ठरवेन आणि ते साध्य करण्यासाठी तितक्याच जिद्दीने कष्ट घेईन. सतत सकारात्मक दृष्टिकोन बाळगेन, जेणेकरून जीवनात ठरवलेली उद्दिष्टे पूर्ण करता येतील. प्रत्येक विषय मला आवडतो आणि प्रत्येक विषयात मी यशस्वी होईन, ही भावना मनावर पक्की बिंबवेन. त्यामुळे कोणत्याही विषयाची भीती मनात शिल्लक राहणार नाही. आजारी असतानाही ‘मी आजारी नाही’ असा विचार मनात रुजवेन, जेणेकरून आजारपण लवकर दूर होईल. ‘मला हे जमणारच नाही’ या नकारात्मक विचाराला माझ्या आयुष्यात कधीच थारा देणार नाही, त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना मनात भीती निर्माण होणार नाही. अशा प्रकारे, ‘सिर्फ दिमाग में डाल देना है।’ या वाक्यामागचा गाभा मी माझ्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्षात उतरवेन.