आरशातली स्त्री स्वाध्याय

आरशातली स्त्री स्वाध्याय इयत्ता बारावी मराठी

१) अ) कृती करा.

१)

उत्तर :

२)

उत्तर :

आ) खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

१) घनगर्द संसार – ……………

उत्तर :

घनगर्द संसार – संसाराचा पसारा. संसारात कंठ बुडून जाणे.

२) प्रेयस चांदणे – ……………

उत्तर :

प्रेयस चांदणे – चांदण्यासारख्या मुलायम, लोभस, अति प्रियतम तारुण्यसुलभ गोष्टी.

३) प्राण हरवलेली पुतळी – ……………

उत्तर :

प्राण हरवलेली पुतळी – भावनाहीन, संवेदनाशून्य, कठोर मनाची स्त्री, निर्जीव मनाची स्त्री.

४) फाटलेले ह्रदय – ……………

उत्तर :

फाटलेले ह्रदय – विस्कटलेले वेदनामय मन.

२) अ) वर्णन करा.

१) आरशातील स्त्रीला आरशाबाहेरील स्त्रीमधील जाणवलेली बदल –

उत्तर :

ती नखशिखान्त अबोल राहणारी स्थितप्रज्ञ राणी झाली आहे. ती मन मोकळे करून बोलत नाही. ओठ घट्ट मिटून संसारात तिने स्वत:ला बुडवून घेतले आहे. ती पारंपरिक स्त्रीत्वाला वरदान समजते. ती पूर्वीच्या प्रियतम गोष्टी आठवत नाही. ती अस्तित्वहीन प्राण नसलेली कठोर पुतळी झाली आहे. गळ्यातला हुंदका दाबून फाटलेले ह्रदय शिवत बसली आहे. तिने मनातल्या असह्य वेदना पदराखाली खाकून घेतल्या आहेत.

२) आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीची काढलेली समजूत –

उत्तर :

अंगणात थांबलेल्या प्रेयस चांदण्याला मनाची कवाडे उघडून आत घे. पूर्वीसारखी मनमुक्त अल्लड हो. परंपरेच्या ओझ्याखाली दबू नको. तुझे चैतन्यमय अस्तित्व पुन्हा प्रस्थापित कर. पारंपरिक स्त्रीत्वाचे जोखड झुगारून टाक. मनमोकळी हो. रडू नको. डोळ्यांतले अश्रू शेजारच्या तळ्यात सोडून दे आणि त्यातील शुभ्र कमळाची प्रसन्न फुले हातात घे.

आ) खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा.

१) बालपणातील तुझा उत्साह आणि तुझ्यातील चैतन्य अवर्णनीय होते.

तारुण्यात नवउमेदीने भरलेली, सर्वत्र सहज संचारणारी अशी तू होतीस.

उत्तर :

पावसाचे तरंग ओंजळीत चैतन्यमयी बालिका अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना

२) आता मात्र तू स्वत:च स्वत:ला संसारात इतकं गुंतवून घेतलं आहेस, की पारंपरिकपणे जगण्याच्या अट्टाहासात तू दिवसरात्र कष्ट सोसत आहेस.

उत्तर :

इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून.

इ) जोड्या लावा.

‘अ’ गट‘ब’ गट
१) अंतरीचे सुंदर पूर्वरंगअ) मनात असलेले प्रचंड दु:ख लपवून ठेवतेस
२) आभाळ झुल्यावर फुलणारीआ) परंपरेने चालत आलेल्या रीतींना वरदान समजून वागणारी.
३) देह तोडलेले फूलइ) उच्च ध्येय बाळगण्याचे स्वप्न रंगवणारी
४) पारंपरिकतेचे वरदानई) कोमेजलेले किंवा ताजेपणा गेलेले फूल
५) पदारखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळाउ) मनातले सुंदर भाव

उत्तर :

‘अ’ गट‘ब’ गट
१) अंतरीचे सुंदर पूर्वरंगउ) मनातले सुंदर भाव
२) आभाळ झुल्यावर फुलणारीइ) उच्च ध्येय बाळगण्याचे स्वप्न रंगवणारी
३) देह तोडलेले फूलई) कोमेजलेले किंवा ताजेपणा गेलेले फूल
४) पारंपरिकतेचे वरदानआ) परंपरेने चालत आलेल्या रीतींना वरदान समजून वागणारी.
५) पदारखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळाअ) मनात असलेले प्रचंड दु:ख लपवून ठेवतेस

३) खालील ओळींचा अर्थ लिहा.

अ) माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली

किती बदललीस ग तू अंतर्बाह्य !

उत्तर :

आरशातली स्त्री आरशाबाहेरील स्त्रीला म्हणते तू नि मी सारख्याच दिसतोस. तू माझे रूप घेतले आहेस. तरीही तू ‘मी’ नाही. तू आतूनबाहेरून किती बदलली आहेस ! तुझ्यातला बदल मानवत नाही.

आ) स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा

नि आज नखशिखांत तू …. तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी !

उत्तर :

आरशातील स्त्री आरशाबाहेरील स्त्रीला तिच्या पूर्वीच्या आठवणी करून देताना सांगते – पूर्वी तू स्वप्नांच्या पंखांवर स्वार होऊन अवघ्या आभाळात मुक्तपणे झोके घेत असायचीस. गगनभरारी घेणारी तू, मनात एक ध्येय जपून होतीस. तू जणू त्या ध्येयाच्याच सुगंधाने भारलेली होतीस. पण आता तू पूर्णतः, आतून-बाहेरून बदलून गेली आहेस. आता तुझ्यात पूर्वीसारखी ती निरागस मुलगी, ती टवटवीत तरुणी उरलेली नाही. आता तू मूकपणे, स्थिर मनाने सारे सोसणारी, स्थितप्रज्ञ अशी एक शांत राणी बनली आहेस.

४) काव्यसौंदर्य

अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला

दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला

बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळतेय तुझी वाट पाहून पाहून

पण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी,

या ओळींतून सूचित होणारा अर्थ उलगडून दाखवा.

उत्तर :

‘आरशातली स्त्री’ या कवितेमध्ये कवयित्री हिरा बनसोडे यांनी आरशाबाहेरील स्त्रीच्या मनात पूर्वीच्या आठवणी जागवत, तिच्या सध्याच्या जगण्यातील वेदना अतिशय परिणामकारक शब्दांत व्यक्त केली आहे.

आरशाबाहेरील स्त्रीला तिची जुनी ओळख पुन्हा करून देताना आरशातील स्त्री सांगते – तू पूर्णपणे बदलून गेली आहेस. पूर्वी तू सगळीकडे फुलणारी, बहरलेली तरुणी होतीस. आता मात्र तू संसाराच्या विळख्यात अडकून गप्प, निःशब्द होऊन सारे काही सोसत बसली आहेस. तुझ्या घराच्या अंगणात तुला अत्यंत प्रिय असलेल्या चांदण्यासारख्या हळुवार, तरल आठवणी अजूनही तुझी वाट पाहत थांबल्या आहेत. पण दार उघडून त्यांना प्रेमाने जवळ घेण्याचेही भान तुला उरलेले नाही. एकेकाळी तू बागेत बेधडक, मोकळेपणाने बागडत असायचीस; त्यावेळी तुझ्यासोबतीने असणारी जाईची वेल आज तुझी प्रतीक्षा करत करत गळून, थकून गेली आहे. तरीही तू पूर्णतः बदलली आहेस – तुझ्यातील स्त्रीत्वाच्या नैसर्गिक भावना मनातच दाबून टाकत, तू जणू निर्जीव, प्राणहीन अशी एक कठोर पुतळी बनली आहेस.

‘वाट पाहणारे प्रिय चांदणे’ आणि ‘थकून गेलेली अल्लड जाई’ या प्रतिमांमधून कवयित्रीने भूतकाळातील स्त्रीच्या मनातील भावना प्रभावीपणे उभ्या केल्या आहेत. याउलट, ‘प्राणहीन, अस्तित्व हरवलेली पुतळी’ या प्रतिमेतून सध्याच्या स्त्रीच्या आतील पोकळी व वेदना ठळकपणे अधोरेखित होते.

५) रसग्रहण.

प्रस्तुत कवितेतील खालील पद्यपंक्तींचे रसग्रहण करा.

तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वत:च हिंदकळतेय

आणि अशातच, मी मला गोंजारीत, जवळ घेत

अधिकारवाणीने म्हणाली –

‘रडू नकोस खुळे, उठ ! आणि डोळ्यातले हे आसू

सोडून दे शेजांरच्या तळ्यात

नि घेऊन ये हातात

नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले’

उत्तर :

आशयसौंदर्य : ‘आरशातली स्त्री’ या कवितेत कवयित्री हिरा बनसोडे यांनी बिंब व प्रतिबिंब यांच्यातील संवादाच्या माध्यमातून स्त्रीच्या पूर्वीच्या निखळ, निर्मळ जीवनाची आणि सध्याच्या संसाराच्या बंधनात अडकलेल्या वेदनादायी जीवनाची तुलना मांडली आहे. आरशातील स्त्री ही आरशाबाहेरील स्त्रीची उमेद कशी जागवते, याचे समर्पक चित्रण वरील ओळींमधून केले आहे.

काव्यसौंदर्य : आरशातील स्त्री ही आरशाबाहेरील स्त्रीला तिच्या भूतकाळातील सुंदर आठवणी पुन्हा जागवून देते, तसेच सध्याच्या काळात परंपरेच्या ओझ्याखाली बदललेल्या तिच्या व्यक्तिमत्त्वाचे भेदक व वास्तव चित्र तिच्यासमोर उभे करते. हे शब्द ऐकून आरशाबाहेरील स्त्री अंतर्मनातून व्याकुळ होते, स्वतःशीच झगडते, द्विधा मनःस्थितीत सापडते. अशा वेळी आरशातील स्त्री तिला मायेने जवळ घेत, धीर देत ठामपणे सांगते – रडणे थांबव, उभी राहा, तुझ्यातील उमेद पुन्हा जागी कर. तुझे अश्रू तळ्यातील पाण्यात वाहून जाऊ दे आणि त्याच तळ्यात नुकत्याच उमललेल्या शुभ्र, टवटवीत, प्रसन्न कमळांना हातात घे. या संवादातून आरशातील स्त्री तिला खंबीरपणे उभे राहण्याचा संदेश देते. सर्व बंधनांतून मुक्त होऊन नैसर्गिक व स्वाभाविक जीवन जगण्याची आणि आपले स्त्रीत्व जपण्याची प्रेरणा देते. वास्तविक पाहता, तिला स्वतःलाच स्वतःच्या खऱ्या अस्तित्वाची जाणीव झालेली आहे, हेच कवयित्रीला या ओळींतून सुचवायचे आहे.

भाषिक वैशिष्ट्ये : ही कविता आपले प्रगल्भ विचार व्यक्त करण्यासाठी मुक्तछंदाच्या (मोकळ्या शैलीच्या) रचनेचा वापर करते. यामुळे मनातील खरेखुरे भाव कोणत्याही बंधनाशिवाय सहजपणे व्यक्त होतात. वर्णनात्मक आणि संवादात्मक भाषाशैलीमुळे कविता प्रवाही व परिणामकारक बनली आहे. परंपरेच्या चुकीच्या जोखडाखाली दबलेल्या स्त्रीच्या मनातील दोन परस्परविरोधी अवस्था या कवितेत समर्पकपणे उभ्या केल्या आहेत. वरील ओळींमध्ये आलेल्या ‘डोळ्यांतील अश्रू तळ्यात विसर्जित करणे’ आणि ‘नव्याने उमललेली शुभ्र, प्रसन्न फुले धारण करणे’ या वेगळ्या व प्रभावी प्रतिमांमधून स्त्रीच्या अंतर्मनातील भावना समर्पकपणे व्यक्त झाल्या आहेत. बिंब-प्रतिबिंब या रचनातंत्रामुळे संपूर्ण कवितेला एक नाट्यपूर्ण परिमाण प्राप्त झाले आहे.

६) अभिव्यक्ती

‘आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला संवाद हा स्वत:शीच केलेला सार्थ संवाद आहे’, हे विधान स्पष्ट करा.

उत्तर :

स्वतःचे मूळ अस्तित्व बाजूला सारून पूर्णपणे संसारात रमलेली स्त्री जेव्हा एकदा आरशासमोर उभी राहते, तेव्हा तिला स्वतःचे प्रतिबिंब दिसते. हे प्रतिबिंब म्हणजे प्रत्यक्षात तिचेच अंतरंग असते. हे अंतरंग तिला भूतकाळातील आठवणींची जाणीव करून देते आणि तिच्यात घडलेल्या दुःखद स्थित्यंतरांची उकल करते. आरशाच्या पलीकडे उभी असलेली स्त्री एकेकाळी निरागस, खोडकर मुलगी होती, उत्साहाने सळसळणारी तरुणी होती, जी मनाला वाटेल तसे मोकळेपणाने वागत असे. मात्र आता तिच्यात संपूर्ण बदल घडून आला आहे. रूढी-परंपरांचे बंधन स्वीकारत तिने स्वतःचे नैसर्गिक रूप संसाराच्या जबाबदाऱ्यांखाली दाबून टाकले आहे. परिणामी तिच्यातील स्त्रीत्वाची खरीखुरी जाणीव हरवून गेली आहे. त्यामुळेच नव्या उभारीचे, आधुनिक व झुंजार स्त्रीचे प्रतीक असणारे शुभ्र, टवटवीत कमळ हाती घेण्याचे आवाहन ते अंतरंग तिला करते आणि तिला तिच्या मूळ सामर्थ्याची, तिच्या सत्त्वाची जाणीव करून देते. वास्तविक पाहता, आरशातील ती स्त्री दुसरी-तिसरी कोणी नसून ती स्वतःच आहे – तिचेच प्रतिरूप, तिचेच अंतर्मन. त्यामुळे हा संवाद म्हणजे तिने स्वतःशी केलेला एक निर्भेळ आणि अर्थपूर्ण आत्मसंवाद ठरतो.


Leave a Comment