दंतकथा स्वाध्याय

दंतकथा स्वाध्याय इयत्ता बारावी मराठी

१) अ) कारणे शोधा व लिहा.

१) लेखकाला दातांबद्दल अजिबात प्रेम नाही, कारण ……………….

उत्तर :

लेखकाला दातांबद्दल अजिबात प्रेम नाही, कारण लहानपणी दात येत असताना त्यांनी घरातल्या माणसांना रडवले होते आणि त्यांच्यावरही रडण्याची पाळी आली होती.

२) दातदुखीच्या काळात दाते किंवा दातार यांना भेटू नये असे लेखकाला वाटते, कारण …………………..

उत्तर :

दातदुखीच्या काळात दाते किंवा दातार यांना भेटू नये असे लेखकाला वाटते, कारण त्यांची सहनशक्ती पूर्णपणे संपली होती आणि दातांशी नावानेसुद्धा जवळीक असलेल्या व्यक्तींना भेटण्याची त्यांना इच्छा नव्हती.

आ) कृती करा.

१)

उत्तर :

२)

उत्तर :

३)

उत्तर :

इ) स्वभाववैशिष्ट्ये लिहा.

१)

उत्तर :

२)

उत्तर :

२) चौकटी पूर्ण करा.

अ) लेखकाच्या मते सहावे महाभूत.

उत्तर :

दात

आ) लेखकाने दुखऱ्या दाताला दिलेली उपमा.

उत्तर :

राक्षस

इ) ऐटीत चालणारा परशा म्हणजे जणू.

उत्तर :

वनराज

ई) लेखकाच्या मते जन्मात एकही दात न दुखणारा माणूस असा असतो.

उत्तर :

कमनशिबी

उ) लेखकाच्या मते कवीने दाताला दिलेली उपमा.

उत्तर :

कुंदकळ्यांची

३) व्याकरण.

अ) खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.

१) चार दिवसांनी दात दुखायचा थांबतो –

उत्तर :

कर्तरी प्रयोग

२) सगळे खूष होतात –

उत्तर :

कर्तरी प्रयोग

३) त्याने माझ्या हिरड्यांत इंजेक्शन दिले –

उत्तर :

कर्मणी प्रयोग

४) डॉक्टरांनी लीलया दात उपटला –

उत्तर :

कर्मणी प्रयोग

आ) खालील तक्ता पूर्ण करा.

सामासिक शब्दसमासाचा विग्रह समासाचे नाव
१) पंचमहाभूते…………………………
२) परमेश्वर…………………………
३) शब्दप्रयोग…………………………
४) शेजारीपाजारी…………………………
५) विजयोन्माद…………………………

उत्तर :

सामासिक शब्दसमासाचा विग्रह समासाचे नाव
१) पंचमहाभूतेपाच महाभुतांचा समूह द्विगू
२) परमेश्वरपरम असा ईश्वरकर्मधारय
३) शब्दप्रयोगशब्दाचा प्रयोगविभक्ती तत्पुरुष
४) शेजारीपाजारीशेजारी, पाजारी वगैरेसमाहार द्वंद्व
५) विजयोन्मादविजयाचा उन्मादविभक्ती तत्पुरुष

इ) खालील वाक्यात दडलेल्या वाक्प्रचार शोधा व लिहा.

माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी, म्हणून दातांची योजना झालेली आहे.

उत्तर :

वाक्प्रचार – दाती तृण धरणे.

ई) खालील वाक्यांचे कंसातील सूचनेनुसार वाक्यपरिवर्तन करा.

१) परशाने प्रश्न नम्रपणे विचारला नव्हता. (होकारार्थी करा.)

उत्तर :

परशाने प्रश्न उद्धटपणे विचारला होता.

२) शिंव्हाला काय भ्या हाय व्हय कुणाचं ? (विधानार्थी करा.)

उत्तर :

शिंव्हाला कुणाचचं भ्या नाही.

३) तुझ्या अंगात लई हाडं हैत. (उद्गारार्थी करा.)

उत्तर :

किती हाडं हैत तुझ्या अंगात !

४) स्वमत.

अ) पाठातील विनोद निर्माण करणारी पाच वाक्ये शोधा. ती तुम्हांला का आवडली ते सकारण लिहा.

उत्तर :

‘दंतकथा’ हा वसंत सबनीस यांनी लिहिलेला एक खुसखुशीत विनोदी लेख आहे. खरे तर दातदुखी हा विषय स्वतःच अतिशय वेदनादायक, करुण आणि गंभीर स्वरूपाचा. पण याच विषयाला लेखकांनी नर्मविनोद, प्रसंगातून निर्माण होणारा विनोद, अतिशयोक्ती आणि शब्दकोट्या यांसारख्या विविध साधनांचा खुबीने वापर करत एक अतिशय प्रसन्न आणि वाचनीय लेख बनवला आहे. याची काही निवडक उदाहरणे पाहूयात.

मराठी भाषेतही दातांना फारसा मान मिळालेला दिसत नाही, कारण दातांविषयी शुभसूचक भावना व्यक्त करणारी एकही म्हण किंवा वाक्प्रचार भाषेत आढळत नाही. लेखकांची पुढील दोन वाक्ये पाहा – त्यांना स्वतःला दातदुखीचा प्रचंड त्रास सहन करावा लागला होता, त्यामुळे साहजिकच त्यांच्या मनात दातांबद्दल प्रेमभावना नसून, उलट काहीसा तिटकाराच निर्माण झालेला दिसतो. हा तिटकारा व्यक्त करण्यासाठी त्यांनी मराठी भाषेचा किती नेमकेपणाने वापर केला आहे, हे बघण्यासारखे आहे. मराठीत दातांविषयी मंगल भाव व्यक्त करणारी म्हण अस्तित्वातच नाही, असे त्यांचे विधान वाचताना पहिल्यांदा गंमत वाटते. पण जरा खोलात जाऊन विचार केला आणि आठवणीत असलेल्या म्हणी तपासून पाहिल्या, की लेखकांचे हे निरीक्षण खरेच अचूक असल्याचे जाणवते.

डोळे, कांती, ओठ, गालावरचा एखादा तीळ किंवा खळी अशा अनेक गोष्टी माणसाला भुरळ घालतात, पण दातांच्या सौंदर्यावर भाळून वेडावलेला प्रियकर अजून आपल्या पाहण्यात आलेला नाही, असे लेखक गमतीने सांगतात. हेदेखील एक मजेशीर पण खरे निरीक्षण आहे, आणि यातून लेखकांची सूक्ष्म निरीक्षणशक्ती स्पष्टपणे दिसून येते. ‘दातांवर भाळलेला प्रियकर’ हा उल्लेख वाचताक्षणीच हसू फुटते.

दातदुखीच्या ठणक्याची तीव्रता किती भयंकर असते, हे सांगण्यासाठी लेखकांनी दिलेले उदाहरणही खूप बोलके आहे. ते म्हणतात की, जणू एखादा लाकूडतोड्या आपल्या दाताच्या मुळाशी खोलवर बसून, एकामागोमाग एक घाव घालत असतो. ही उपमाही अतिशय समर्पक आणि परिणामकारक आहे. या उदाहरणातून एक विलक्षण चमत्कृती जाणवते, आणि दातदुखीचा तो जीवघेणा ठणका जणू वाचतानाही आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायला मिळतो.

विनोदनिर्मितीचे हे कौशल्य लेखकांकडे खरोखरच विलक्षण प्रमाणात आहे, हे यातून स्पष्ट होते.

आ) लेखकाने दुखऱ्या दाताची तुलना अक्राळविक्राळ राक्षसाशी केलेली आहे, याबाबत तुमचे मत लिहा.

उत्तर :

दातदुखीच्या असह्य वेदनांचा अनुभव जवळजवळ प्रत्येकालाच कधी ना कधी आलेला असतो. या वेदना सहनशक्तीच्या पार पलीकडच्या असतात. अशा वेळी नुसते ओरडत बसण्याखेरीज हातात दुसरे काहीच उरत नाही. हाताला, पायाला किंवा डोक्याला जखम झाली तर निदान त्यावर पट्टी बांधता येते, मलम लावता येते. पण दातदुखीच्या बाबतीत मात्र असा कोणताच सोपा उपाय अस्तित्वात नाही. डोके दुखत असेल किंवा अंग दुखत असेल, तर शेक दिल्याने बरे वाटते; डोके दाबले, अंग रगडले किंवा पाय चेपले, तरी थोडासा आराम मिळतो. पण दातदुखीवर मात्र यांतला एकही घरगुती उपाय काम करत नाही.

लेखकांनी दातदुखीच्या या प्रसंगाचे टिपलेले निरीक्षण मात्र विलक्षण अचूक आहे. ते वाचताना आपली स्वतःची दातदुखीची आठवण जागी झाल्याशिवाय राहत नाही. दात किंवा दाढ दुखू लागली, की त्याचे ठणके जीव नकोसा करणारे असतात. आपल्या दाढेच्या मुळाशी जणू कोणी लाकूडतोड्या बसून, एकामागोमाग एक घाव घालत असल्याचा भास होतो. डॉक्टरांनी दिलेल्या औषधाने क्षणभर बरे वाटते खरे, पण लगेचच पुन्हा ते जीवघेणे ठणके सुरू होतात. प्रत्येक ठणक्यासरशी वेदनेची एक लाट थेट कपाळात शिरते आणि जणू डोके फुटून ती बाहेर येईल, असे वाटू लागते. या वेदनेचे रूप इतके प्रचंड असते की तिला राक्षसाशिवाय अन्य कोणतीच उपमा शोभत नाही.

दिवस कसातरी निघून जातो, पण रात्र जवळ येऊ लागली की मात्र मनात धडकी भरू लागते. रात्री जर पुन्हा ठणके सुरू झाले तर काय, या नुसत्या कल्पनेनेच जीव कासावीस होतो. एकदा का रात्रीचे ठणके सुरू झाले, की आरडाओरडा करण्याखेरीज हातात दुसरे काहीच उरत नाही. रात्रीच्या वेळी वाहन सहजासहजी मिळत नाही, डॉक्टरांचे दवाखाने बंद असतात, हॉस्पिटल कुठेतरी लांब असते. भीतीनेच अर्धा जीव जातो, आणि डोक्यात जणू घणाचे घाव पडत राहतात. अशा वेळी इतर माणसे मदतीला धावून येऊ शकतात, पण त्या वेदना मात्र त्या कोणालाच वाटून घेता येत नाहीत. जो स्वतः ती वेदना भोगतो, त्यालाच लेखकांनी दातदुखीला दिलेली त्या भयाण राक्षसाची उपमा खऱ्या अर्थाने उमजू शकते.

इ) लेखकाच्या दातदुखीबाबत शेजाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांच्या संदर्भात एक छोटे टिपण तयार करा.

उत्तर :

वेळ बसून, गप्पा मारल्या तर त्याचे मनही थोडे रमते, त्याला बरे वाटते. हे जर खरोखर असे घडले, तर ती चांगलीच गोष्ट म्हणावी लागेल.

पण वास्तवात प्रत्यक्ष काय होते? माणसे भेटायला येतात खरी, पण त्यांच्या गप्पा कशा असतात? सुरुवातीला जुजबी बोलणे होते, आणि लगेचच संभाषणाचा रोख रुग्णाच्या आजाराकडे वळतो. मग त्या आजाराबाबत नको त्या गोष्टींची चर्चा सुरू होते – हा आजार किती गंभीर आहे, त्यात किती यातना सहन कराव्या लागतात, त्यामुळे किती नुकसान होते, याच आजाराने आधी कोणाकोणाचा मृत्यू झाला, अशा एक ना अनेक गोष्टी बोलल्या जातात. अशा बोलण्यामुळे रुग्णाचे मनोधैर्य वाढण्याऐवजी उलट तेच खचते. त्याची काळजी अधिकच वाढते, तो नकारात्मक विचारांच्या गर्तेत अडकतो, मानसिकरीत्या तो अधिकच कोलमडतो. अशा मनःस्थितीत आजाराशी झुंजण्याची त्याची इच्छाशक्तीच कमी होऊन जाते. याचा त्याच्या तब्येतीवर उलट परिणाम होतो.

हॉस्पिटलमध्ये भेटायला जाताना भेटीच्या वेळेवर बंधन असते, ठरावीक वेळेतच जाता येते – तोपर्यंत ठीक आहे. पण रुग्ण जर घरी असेल, तर मात्र लोक कोणत्याही वेळी, कितीही उशिरा घरी येऊन धडकतात आणि वेळेचे भानही न ठेवता तासन्तास गप्पा मारत बसतात. रुग्णाला इतर काही कामे आहेत का, घरच्या मंडळींना काही अडचणी येत आहेत का, त्यांच्यापैकी कोणाला बाहेर जायचे आहे का, विश्रांतीची गरज आहे का – अशा कोणत्याच गोष्टींचा विचार भेटायला येणारे करत नाहीत. यामुळे रुग्णाला उगीचच त्रास सहन करावा लागतो. खरे पाहता आजारी व्यक्तीच्या संपर्कात इतरांनी शक्य तितके कमी यायला हवे, पण हे साधे पथ्यसुद्धा कोणी पाळताना दिसत नाही. त्यामुळे आजारी व्यक्तींना भेटण्याबाबत काही ठोस नियम, काही पथ्ये आखून त्यांचा जाणीवपूर्वक प्रसार करणे ही आजच्या काळाची खरी गरज आहे.

५) अभिव्यक्ती

प्रस्तुत पाठ तुम्हांला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा.

उत्तर :

पाठ्यपुस्तकातील अनेक पाठांपैकी ‘दंतकथा’ हा विनोदी पाठ मला विशेष भावला. हा पाठ मी अनेकदा वाचला आणि दरवेळी नव्याने आनंद मिळाला. या पाठाचे लेखक वसंत सबनीस आहेत.

खरे पाहता दातदुखी हा प्रसंग अतिशय त्रासदायक असतो, तो माणसाला पूर्णपणे हतबल करतो. या पाठाचा गाभा हाच प्रसंग आहे. तथापि लेखकांनी या वेदनादायक अनुभवाकडे सहानुभूतीच्या भावनेतून न बघता, एका मिश्किल आणि हलक्याफुलक्या दृष्टिकोनातून पाहिले आहे. दृष्टिकोन बदलल्यामुळे संपूर्ण प्रसंगाचे स्वरूपच पालटून जाते, आणि त्यातून माणसाच्या स्वभावातील गमतीशीर विसंगती अधिक स्पष्टपणे समोर येतात. हा बदललेला दृष्टिकोन लेखकांनी सौम्य, खेळकर शैलीत मांडला आहे. या तिरकस नजरेमुळे आणि नर्मविनोदी भाषेमुळे वाचकांच्या ओठांवर हसू उमटल्याशिवाय राहत नाही; कधी कधी तर वाचक मनमोकळेपणाने हसतो. लेखकांनी माणसाच्या स्वभावातील बारकावे मार्मिकपणे हेरले असून, त्यातील विसंगतीही विनोदी अंगाने उलगडून दाखवल्या आहेत. दातदुखीच्या प्रसंगी प्रत्यक्षात घडणाऱ्या गोष्टी अतिशयोक्तीचा खुबीने वापर करत रंगवल्या आहेत. प्रचलित म्हणी व वाक्प्रचारांवर कोट्या करून त्यातून विनोदनिर्मिती साधली आहे. शब्दांच्या चतुर वापरामुळे संपूर्ण पाठ खुसखुशीत आणि वाचनीय बनला आहे.

याची एक-दोन उदाहरणे बघता येतील. पाठाच्या सुरुवातीलाच दाताचा संबंध पंचमहाभूतांशी जोडला आहे. पंचमहाभूते ही या विश्वाच्या घडणीमागील पायाभूत तत्त्वे मानली जातात, तर दात हा माणसाच्या शरीराचा एक साधा भाग. या साध्या अवयवाला लेखकांनी ‘सहावे महाभूत’ असे संबोधले आहे. एका अगदी सामान्य गोष्टीला असे मोठेपण बहाल केल्यामुळे एक गमतीदार विसंगती निर्माण होते. त्यापुढच्याच परिच्छेदात, ईश्वराला दाताची कल्पना सुचायला सहा-सात महिने लागले असावेत, असे लेखक सुचवतात. हे वाचून आपोआप हसू फुटते. परमेश्वर हा सर्वशक्तिमान आणि परिपूर्ण मानला जातो, तरीही त्याला दाताची कल्पना उशिरा सुचल्याचे सांगून लेखकांनी त्याला माणसाच्या जवळ आणले आहे. यातूनही एक विनोदी विरोधाभास तयार होतो.

भाषेसंबंधीचे निरीक्षणही तितकेच रंजक आहे. मराठीत दाताशी संबंधित एकही शुभसूचक म्हण किंवा वाक्प्रचार आढळत नाही. उलट, दातांवरून जे वाक्प्रचार रूढ आहेत, ते गरिबी, भिकारीपणा आणि उद्धटपणा दर्शवणारे आहेत. हे निरीक्षण भाषेला एक वेगळाच ठसका देते. ‘प्रेयसीचे दात पाहून वेडावलेला प्रियकर’ अजून आपल्याला भेटलेला नाही, असेही लेखक गमतीने नमूद करतात.

अशा उल्लेखांमुळे या पाठाला एक खेळकर, खुसखुशीत आणि विनोदी बाज प्राप्त झाला आहे. हा पाठ कोणत्याही वाचकाला सहजपणे आवडेल असाच आहे.

Leave a Comment