भारत आणि युरोपीय वसाहतवाद स्वाध्याय इयत्ता बारावी इतिहास
प्रश्न. १. अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा.
१. वास्को-द-गामा हा ………………… या देशाचा दर्यावर्दी होता.
अ) पोलंड
ब) इंग्लंड
क) फ्रान्स
ड) पोर्तुगाल
उत्तर :
वास्को-द-गामा हा पोर्तुगाल या देशाचा दर्यावर्दी होता.
२. इंग्लंडच्या ………………. ने कंपनीला पूर्वेकडील देशांची व्यापार करण्याचा परवाना दिला.
अ) सर जॉर्ज ऑक्झिंडेन
ब) एलिझाबेथ राणी
क) राज्यकन्या ब्रॅगंझा
ड) दुसरा चार्ल्स
उत्तर :
इंग्लंडच्या एलिझाबेथ राणी ने कंपनीला पूर्वेकडील देशांची व्यापार करण्याचा परवाना दिला.
ब) पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
|---|---|
| १. अर्सबिश्पु | – मुख्य कार्यकारी अधिकारी |
| २. शान्सेलर | – न्यायाधीश |
| ३. वेदोर द फझेंद | – मालमत्तेवरील अधिकारी |
| ४. कपितांव | – कॅप्टन |
उत्तर :
चुकीची जोडी : अर्सबिश्पु – मुख्य कार्यकारी अधिकारी
दुरुस्त जोडी : अर्सबिश्पु – मुख्य धर्मगुरु
प्रश्न. २. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

उत्तर :

प्रश्न. ३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
१. भारतातील सत्ताधीशांना कार्ताझ घेणे गरजेचे होते.
उत्तर :
दक्षिण भारतातील स्थानिक राजांमधील परस्पर संघर्षांचा फायदा उठवत पोर्तुगिजांनी आपले हातपाय पसरले. आपल्या वसाहतींचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी किल्ले बांधले. त्यांच्याकडील आरमार अत्यंत सामर्थ्यशाली असल्याने ते किनारपट्टीवर हल्ले चढवून शत्रूचा प्रदेश उद्ध्वस्त करत असत. एवढ्या ताकदवान आरमाराशी टक्कर देणे स्थानिक भारतीय राजसत्तांच्या आवाक्याबाहेरचे होते. कालांतराने हिंदी महासागरावर पोर्तुगिजांची पकड मजबूत झाल्यानंतर, भारतीय राजांना या सागरी मार्गाने जहाजे पाठवायची झाल्यास पोर्तुगिजांकडून ‘कार्ताझ’ नावाचा परवाना मिळवणे बंधनकारक झाले. हा परवाना न घेता प्रवास करणाऱ्या जहाजांना पोर्तुगीज एकतर ताब्यात घेत किंवा समुद्रात बुडवून टाकत.
२. पोर्तुगिजांशी लढा देणे भारतीयांना अवघड झाले होते.
उत्तर :
सतराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात पोर्तुगालहून दरवर्षी सरासरी पाच जहाजे भारताकडे रवाना होत असत. या जहाजांवर तोफा बसवलेल्या असत. जहाजबांधणीचे काम पोर्तुगीज दमण, वसई आणि गोवा या ठिकाणी करत असत, कारण या भागांत जहाजबांधणीसाठी लागणारे टिकाऊ सागवानी लाकूड मुबलक प्रमाणात मिळत असे. पोर्तुगीज आरमारासाठी लागणारे सैनिकही खास पोर्तुगालमधून भारतात पाठवले जात. याच सुमारास छत्रपती शिवाजी महाराज सोडले तर अन्य कोणत्याही भारतीय सत्तेकडे स्वतःचे स्वतंत्र आरमार नव्हते, त्यामुळे पोर्तुगिजांच्या सागरी सामर्थ्याला तोंड देणे भारतीयांसाठी कठीण काम होते.
प्रश्न. ४. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
१. भारतात पोर्तुगिजांनी कोठे कोठे वसाहती स्थापन केल्या ?
उत्तर :
इ. स. १६०८ पर्यंत भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर दिव, दमण, चौल, गोवा, होनावर, गंगोळी, बसरुर, मंगलोर, कन्नूर, कोडूंगलूर, कोची आणि कोल्लम येथे पोर्तुगीजांनी वसाहती उभारल्या तसेच पूर्व किनाऱ्यावर नागपट्टीणम, मयिलापुर आणि बंगालमध्ये हुगळी येथे पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी वसाहती उभारल्या होत्या.
२. डच सरकारने युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला कोणकोणते अधिकार दिले ?
उत्तर :
इ. स. १६०२ मध्ये अनेक डच कंपन्यांनी एकत्र येऊन युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली. त्या कंपनीला पूर्वेकडील देशांनी व्यापार करण्याचा अधिकार डच सरकारने दिला. त्याअंतर्गत कंपनीला नोकर ठेवणे, वखारी स्थापन करणे, किल्ले बांधणी, नाणी पाडणे, पौर्वात्य देशाशी युद्ध वा तह करणे असे अधिकार मिळाले.